photo 
मराठवाडा

ना ढोल... ना ताशा.... तरीही आनंदात आला गणपती राजा...

गणेश पांडे

परभणी ः यंदा कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सवावर सावट आलेले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी शनिवारी कुठेही ना ढोल वाजला ना ताशा कडाडला. परंतू, विघ्नहर्त्या गणेशाचे गणेशभक्तांनी तितक्याच आनंद व उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. घरोघरी गणेशमुर्ती नेऊन नागरिकांनी मनोभावे प्रतिष्ठापणा केली. बाप्पा....! जगावर आलेले कोरोनाच्या महामारीचे विघ्न पळवून लाव... असे साकडे घालत गणेश मुर्तींची पुजा केली. शहरासह जिल्ह्यात यानिमित्ताने प्रशासनाने तयारी केली होती. तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

सार्वजनिक गणेशोस्तवाला आज शनिवार (ता.२२) पासून सुरूवात झाली. गेल्या १२ महिण्यापासून बाप्पाची वाट पाहणाऱ्या गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. यावर्षीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी, घरगुती पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचा पालन करून गणपती बाप्पाचे प्रत्येकाच्या घरी आनंदात स्वागत झाले. प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून आली.

नागरिकांची खरेदीसाठी गर्दी 
परभणी शहरात गणेशोत्सवाला शनिवारपासून उत्साहात सुरुवात झाली. कोरोनाचे मळभ दुर सारून सर्वच गणेश भक्तांनी यंदाही उत्साह दाखविला. सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नसली तरी घरोघरी मात्र बाप्पाचे त्याच आनंदाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच परभणीतील गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, क्रांती चौक व स्टेशनरोडवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली. ऐरवी दरवर्षी नागरिकांच्या गर्दीने खचाखच भरून दिसणारा गांधी पार्कात यंदा मात्र खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तुरळक गर्दी दिसत होती. 

गणेश मुर्तीची दुकाने विभागली
ऐरवी गांधी पार्क परिसरात गणेश मुर्तीची दुकाने लागलेली असतात. मात्र यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण रहावे यासाठी गणेश मुर्तीची दुकाने वसमत रस्ता व शनिवार बाजार परिसरात हलविण्यात आली होती. त्यामुळे गर्दी विभागली गेली. त्यामुळे गांधी पार्क परिसरात नागरिकांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसत होते.

संपादन ः राजन मंगरुळकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT