Wrestlers News, Ausa 
मराठवाडा

कुस्तीगिरांच्या ‘शड्डू’चा आवाज ओझ्याखाली, महाराष्ट्र केसरी उपविजेत्याची खंत

जलील पठाण

औसा (जि.लातूर) : मराठवाड्यातील अनेक कुस्तीगिरांच्या ‘शड्डू’चा आवाज परिस्थितीच्या ओझ्याखाली दबतोय. केवळ हलाखीची आर्थिक स्थिती असल्याने अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारूपाला येण्याआधीच संपून जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात याच खेळाडूंना राजाश्रय मिळतो, तर अनेक खेळाडूंना संस्था, कारखाने, उद्योजक मानधन देऊन त्यांना प्रोत्साहन देतात. मराठवाड्यात असे होताना दिसत नसल्याने अनेक गुणी खेळाडू अंधारात चाचपडत असल्याची खंत ‘महाराष्ट्र केसरी’चा उपविजेता शैलेश शेळके याने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.


औसा तालुक्यातील टाका येथील शैलेश ‘महाराष्ट्र केसरी २०१९’ चा उपविजेता आहे. गरीब कुटुंबातील या गुणी खेळाडूला नेहमी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. गावातील लाल मातीत कुस्ती शिकलेल्या या मल्लाने काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल काळभोर यांच्या मदतीने थेट ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम लढतीत धडक मारली. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर जिल्ह्यात दुसरा मल्ल महाराष्ट्र केसरी विजेता होणार म्हणून संपूर्ण लातूर जिल्हा व मराठवाडा डोळे लावून बसला होता; पण विजयाने त्याला हुलकावणी दिली आणि हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली.


कुस्तीबाबत शैलेश म्हणतो, की पूर्वी गावागावांत तालमी होत्या. आता त्या लोप पावत चालल्या आहेत. खेळाडूला जिल्ह्याच्या ठिकाणी मॅट, तंत्रशुद्ध प्रशिक्षक, व्यायामासाठी आधुनिक साधने आदींची कमतरता आहे. जिल्हास्तरावर अशी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून या खेळाडूंना आर्थिक मदत होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ परिस्थिती नाही म्हणून अनेक गुणी खेळाडू खेळापासून दूर आहेत. काहींनी प्रयत्न सुरू ठेवले असले, तरी खर्चाचा ताळमेळ लागत नाही. औसा तालुक्यातील अजून एक महिला मल्ल लक्ष्मी पवार हिचीही हीच कहाणी असल्याचे त्याने सांगितले. लातूर जिल्ह्यात अनेक कारखाने, उद्योग, राजकीय मंडळी असतानाही या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.


शरद पवार यांचा आवर्जून उल्लेख
शैलेश म्हणाला, की महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धनला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारा लाख रुपये बक्षीस दिले. यामुळे केवळ खेळाडूचा आर्थिक प्रश्नच सुटतो असे नाही तर त्यांना प्रोत्साहन मिळते. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात नामवंत खेळाडू उदयास येतात. मराठवाड्यातील खेळाडूंना जर राजाश्रय मिळाला नाही तर खेळाडू तयार होणे कठीण असल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT