No PF Reduction in Aurangabad Municipal Corporation
No PF Reduction in Aurangabad Municipal Corporation 
मराठवाडा

अजब तुझे सरकार! कंत्राटींना सुविधा, कायम वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधादेखील महापालिकेतील सुमारे साडेआठशे कायम कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांचा साधा पीएफही (प्रोव्हिडंट फंड) कापला जात नसल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. 

महापालिकेत सध्या एक हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यांच्या पीएफचे व ईएसआयसीचे पैसे भरले जातात; मात्र सुमारे साडेआठशे कर्मचाऱ्यांना हे लाभदेखील मिळत नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करीत नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2005 पूर्वी भरती झालेल्या
कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शन योजना लागू आहे.

त्यानंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करणे गरजेचे होते; मात्र, 2005 पासून भरती झालेल्या साडेआठशे कायम कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ सुरू झालेला नाही. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफची रक्कमही कपात केली जात नाही. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी समिती नियुक्त केली. त्या समितीने अभ्यास करून आयुक्तांना अहवाल सादर केला.

आयुक्तांनी एक जानेवारी 2019 पासून या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना करण्याचे आदेश दिले; परंतु 2005 ते 2018 या कालावधीबाबत मात्र निर्णय घेतला नाही. 

इतर महापालिकांचा करणार अभ्यास 

राज्यातील इतर महापालिकांनी याबाबत काय केले याची माहिती घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आता अधिकाऱ्यांची समिती माहिती घेत आहे; मात्र माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने प्रश्‍न अद्याप प्रलंबित आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT