Latur District Collector G.Sreekant 
मराठवाडा

दातृत्वाच्या त्या फोटोसेशनला लातूर जिल्हाधिकाऱ्यांची मनाई

विकास गाढवे

लातूर : गरजूला केलेली मदत आणि दान हे एका हाताने केले तर दुसऱ्या हाताला कळू नये, असे म्हणतात; मात्र टाळेबंदीच्या काळात काही दानशूरांनी त्याचा बाजार मांडला. गरजूंना थोडेफार अन्नधान्य, वस्तू व अन्नपाकिटे दान करून त्याची सोशल मीडियावर; तसेच प्रसारमाध्यमांतून मोठी प्रसिद्धी मिळविण्याचे प्रकार सुरू झाले. खायचे वेगळे अन् दाखवायचे वेगळे, असे करणाऱ्यांची संख्या वाढली. यातूनच गरजवंतांची चेष्टा सुरू झाली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याची गंभीर दखल घेत मदत व दान करताना होणाऱ्या फोटोसेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मनाई केली आहे.


असे फोटो काढून सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांना दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही जी. श्रीकांत यांनी शनिवारी (ता.११) काढलेल्या आदेशातून दिला आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांची अडचण झाली असून हाताला काम नसल्याने पोटाची खळगी भरण्याची चिंता त्यांना आहे. जिल्हा प्रशासनाने अशा लोकांसाठी निवारागृह सुरू करण्यासोबत प्रशासनाच्या माध्यमातून पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य; तसेच वस्तूंचे किट देण्यात येत आहे. काही खासगी संस्था व व्यक्तींनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. यातच प्रसिद्धीचा हव्यास ठेवून काहींनी दातृत्व निभावण्यास सुरवात केली. कमी दान देऊन प्रसिद्धी छान करण्यात अनेकांनी कौशल्य दाखविण्यास सुरवात केली.

यात दान घेणाऱ्यांची चांगलीच गोची झाली. त्यांची अवहेलना होऊन लागली. टाळेबंदीच्या अडचणीमुळे गरजेसाठी पसरलेले हात समाजात सर्वांनाच दिसू लागले. यामुळे त्यांच्या गरिबीची चेष्टा होऊ लागली. फुकटच्या सहानुभूतीमुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही ठिकाणी दान देताना सामाजिक सुरक्षित अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) भानही ठेवले जात नव्हते. अन्नधान्य; तसेच अन्नपाकिटांचे वाटप करताना गर्दी होऊ लागली. यातून टाळेबंदीचा फज्जा उडू लागला. याची गंभीर दखल घेत श्रीकांत यांनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व अन्य वस्तूंचे दान करतानाचे फोटो घेऊ नयेत किंवा त्याचे छायाचित्रीकरण (व्हिडिओ) करू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत. असे करण्यास; तसेच फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरही पाठविण्यास त्यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT