संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

शाकाहारी तरुणीला पाठविले नॉनव्हेज नुडल्स 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  ऑनलाइन ऑर्डर दिलेल्या एका शाकाहारी युवतीला चक्‍क मांसाहारी नुडल्स मिळाले. याप्रकरणी स्विगी कंपनीसह गरीबशहा बाजार परिसरातील चायनीज कॉर्नर हॉटेलचालकाने युवतीला पंधरा हजारांच्या नुकसानभरपाईचे आदेश जालना ग्राहक मंचाने दिले आहेत. 

शहरातील एका तरुणीने जून महिन्यात स्विगी कंपनीच्या ऍपच्या माध्यमातून सत्तर रुपये किमतीच्या शाकाहारी सेझवान नुडल्सची मागणी केली होती. मात्र, स्विगी कंपनीच्या वितरक कर्मचाऱ्याने तिला दिलेले नुडल्स शाकाहारीऐवजी मांसाहारी चिकन सेझवान निघाले. या प्रकाराविरोधात युवतीने जालना ग्राहक मंचात तक्रार केली.

याप्रकरणी सुनावणीसाठी ग्राहक मंचाने स्विगीसह अन्न देण्यात आलेल्या गरीबशहा बाजार परिसरातील पुना चायनीज कॉर्नर हॉटेलला नोटीस बजावली. स्विगी कंपनीमार्फत ऍड. डी. बी. नाईक यांनी बाजू मांडली. युक्‍तिवाद करताना, स्विगी कंपनी ग्राहक आणि खासगी हॉटेल यांच्यामधला दुवा म्हणून काम करते. त्यामुळे कंपनी फक्त ग्राहकांपर्यंत अन्न पोचविण्याचे काम करते. त्यामुळे रेस्टॉरंटने चुकीचे खाद्यपदार्थ पाठविल्यास कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे कंपनीचे नाव या प्रकरणातून कमी करण्याची विनंती केली. तर नोटीस बजावूनही हॉटेलचालक सुनावणीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे ग्राहक मंचाच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्या नीता कांकरिया व एम. एम. चितलांगे यांनी त्यांच्याविरोधात ता. 27 ऑक्‍टोबर रोजी एकतर्फी आदेश पारीत केले.

ग्राहक मंचाने तक्रारदार ग्राहक व स्विगी कंपनीच्या वकिलांच्या कथनावरून व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करून ही सेवेतील त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढला. यामुळे तक्रारदार तरुणीस झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसानभरपाई म्हणून कंपनीने पाच हजार वीस रुपये, तर अन्नपदार्थ दिलेल्या हॉटेलचालकाने दहा हजार 50 रुपये तीस दिवसांत देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. या प्रकरणात तक्रारदार तरुणीने स्वतः आपली बाजू मांडली, तर कंपनीमार्फत ऍड. डी. बी. नाईक यांनी काम पाहिले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT