मराठवाडा

नको नको म्हणता तो पुन्हा आलाच...

कैलास चव्हाण

परभणी ः तो मागील काही दिवसांपासून अधुन-मधुन चक्कर मारू लागला आहे. याआधीही त्याने गतवर्षीदेखील नको-नको म्हणता चांगलाच धुमाकुळ घातला होता. आता त्याच्या आगमनासाठी अनुकुल स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु, त्याचे असे हे अवेळी येणे सर्वांनाच महाग पडणार आहे. कितीही नको म्हटले तरी तो मी पुन्हा येईन..पुन्हा येईन असे म्हणत तो हजेरी लावत आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसुन अवकाळी पाऊस होय.

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस हजेरी लावत आहे. सतत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झालेली आहे. हिवाळ्यात पावसाळा अशी स्थिती झाली आहे. दररोज आभाळ भरून येत आहे. दिवसभर सुर्यदर्शन होत नसल्याने काळोखमय वातावरण तयार झाले आहे. त्यात थंडगार वारे सुटत आहेत. त्याचा परिणाम म्हणून हुडहुडी भरली आहे. या आठवड्यात तीन वेळा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

शुक्रवारी दुपारपर्यंत क्वचितच सुर्यदर्शन
शुक्रवारी (ता.तीन) पहाटे दोनच्या सुमारास परभणी जिल्ह्यात सोनपेठ, गंगाखेड तालुक्यात पाऊस झाला. सुरुवातीची काही मिनीटे गारांचा पाऊस झाला. त्यानंतर दहा मिनीटे पाऊस सुरु राहिला. परभणी शहरात देखील पहाटे काहीवेळ पाऊस झाला. सकाळी सातच्या दरम्याण काळेकुट्ट ढग जमा झाल्याने काळोख पसरला होता. दुपारी १२ वाजेपर्यंत सुर्यदर्शन झाले नाही. अधुन-मधुन पावसाची भुरभुर सुरु होती. दुपारी १२ नंतर क्वचितच सुर्यदर्शन झाले. त्यानंतर पुन्हा काळोख पसरला. दरम्यान गुरुवारी (ता.दोन) सायंकाळी सहा वाजता पूर्णा आणि परभणी तालुक्यात रिमझिम पाऊस झाला.या वातावरणाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. घराबाहेर पडणारे  सर्वजण उबदार कपड्यात दिसू लागले आहेत. मागील तीन दिवसांपासून शहरात पाऊस पडू लागल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाळ्यासारखा चिखल झाला आहे.

गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस
गंगाखेड शहरासह तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री ११ वाजता अर्धा तास पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान पुन्हा अर्धा तासाहून अधिकवेळ पाऊस झाला. पहाटे उजाडल्यानंतर देखील अधुन-मधुन हलक्या सरी होत्या.

पिकांच्या नुकसानीची भिती
सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. हरबरा, ज्वारी, गहु ही पिके जोमात आहेत. तर तुर हे पिक कापनीला आले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा परिणाम या पिकांवर होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरबरा आणि ज्वारी पिकावर अळ्यांनी हल्ला केला आहे. गव्हाची देखील वाढ खुंटली आहे तर तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्या झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता
अवकाळी पाऊस अजुनही जायला तयार नाही. शनिवारी (ता.चार) नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे. अन्य जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील, अशी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! शीतल तेजवानीला जामीन मंजूर; पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण

Satej Patil Mushrif Abitkar Meetting : 'गोकुळ' दुधाचा चहा अन् मुश्रीफ, अबिटकर, बंटी पाटलांची बैठक; शिवाजी विद्यापिठात राजकीय टोमणेबाजी

Nagpur: चिंताजनक; धरणांमध्ये केवळ ३५ टक्के जलसाठा;कमी पाऊस व मॉन्सूनला विलंबाची शक्यता, पाणी जपून वापरण्याची गरज

Gadchiroli: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोकुळनगरतील रस्त्याची मागणी पूर्ण; नागरिक आनंदले; नगराध्यक्षांचा पुढाकार, उपाध्यक्षांनी केला पाठपुरावा

फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातही गौतमीची क्रेझ ! "हिल पोरी हिला" गाणं होतंय युट्युबवर ट्रेंड

SCROLL FOR NEXT