औंढा नागनाथ ः येथील नगर पंचायतर्फे मंगळवारी प्लॅस्‍टिममुक्‍ती अभियान राबविण्यात आले.
औंढा नागनाथ ः येथील नगर पंचायतर्फे मंगळवारी प्लॅस्‍टिममुक्‍ती अभियान राबविण्यात आले. 
मराठवाडा

अबब... ९७ किलो प्लॅस्‍टिक कचरा केला गोळा

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः येथील नगरपालिका प्रशासनाने शहरात मंगळवारी (ता. सात) प्लॅस्‍टिकमुक्‍त अभियान राबविले. यात व्यापारी, फेरीवाले, दुकानदार, सेवाभावी संस्‍था, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी पर्यावरणास घातक असा ९७ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात आला.

पालिका प्रशासनाने प्लॅस्‍टिकमुक्‍त करण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी सात वाजता या अभियानाला इंदिरा गांधी चौकातून सुरवात झाली, ते जिल्‍हाधिकारी कार्यालय, महात्‍मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्‍मा गांधी चौकातील पार्किंग परिसर, चौधरी पेट्रोलपंप ते अग्रसेन चौक, बसस्‍थानक, व्यापारी संकुलन, औंढारोड, रामलीला मैदान या ठिकाणी विविध भागातील पर्यावरणास घातक असा प्लॅस्‍टिक कचरा वेचण्यात आला. तसेच शहरात असा कचरा वेचून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यांचा उपक्रमात सहभाग
या वेळी नगरपालिकचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, शहर अभियंता आर. एस. अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, स्‍वच्‍छता निरीक्षक बाळू बांगर, पाणीपुरवठा अभियंता श्री. हिरेमठ, स्‍थापत्य अभियंता श्री. ईटकापल्‍ले, लेखापाल अनिकेत नाईक, संगणक अभियंता कपिल धुळे, रचना सहायक किशोर काकडे, श्री. पुतळे, बी. टी. काळे, डी. पी. शिंदे, डी. बी. ठाकूर, बी. के. राठोड, विजय रामेश्वरे, आशीष रनसिंगे, गजानन बांगर, मनोज बुर्से, संदीप गायकवाड, मनोहर कीर्तनकार, नितीन पहीनकर, ललिता खंदारे यांच्यासह स्‍वच्‍छता विभागाचे कर्मचारी, योग विद्याधाम समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी यांचा सहभाग होता.

औंढा नागनाथ येथे प्लॅस्‍टिकमुक्‍ती मोहिमेंतर्गत फेरी
औंढा नागनाथ ः येथे नगर पंचायतर्फें मंगळवारी (ता. सात) प्लॅस्टिकमुक्त अभियानांतर्गत प्लॅस्‍टिक वेचा मोहीम व आपले शहर प्लॅस्टिकमुक्त यासंदर्भात शहरातून फेरी काढून औंढा शहरातील विविध भागांमध्ये प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. या फेरीमध्ये ‘चला सर्व मिळून करूया आपले शहर प्लॅस्टिकमुक्त’ अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या. या वेळी प्लॅस्टिकमुक्त औंढ्याच्या प्लॅस्टिक वेचा मोहिमेला हिरवी झेंडी नगराध्यक्षा विजयमाला मुळे यांनी दाखविली. 

विविध शाळेचे २५१ विद्यार्थी सहभागी 
नागनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, नागेश्वर प्राथमिक शाळा या शाळेचे २५१ विद्यार्थी सहभागी होते. या वेळी डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, नागनाथ मंदिर परिसर, देशमुख गल्ली, औंढा ग्रामीण दवाखाना, बालाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक आदी भागातील सर्व परिसरातील प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. तसेच नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा हे घंटागाडीत टाकावे, असे आवाहन करण्यात आले. 

कळमनुरीत विद्यार्थ्यांची पथनाट्यातून प्लॅस्‍टिकबंदीबाबत जनजागृती
कळमनुरी ः कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. सात) प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्लॅस्टिकबंदीबाबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. या उपक्रमांमधूनच ‘प्लॅस्टिकबंदी व प्लॅस्टिक वेचा’ हा उपक्रम मंगळवारी घेण्यात आला. या उपक्रमात महात्मा जोतिबा फुले विद्यालय, गुलाब नबी आझाद हायस्कूल व केंब्रिज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी व महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिकबंदीबाबत काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीला नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

कळमनुरीत विद्यार्थ्यांनी दिली दुष्परिणामाची माहिती
विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती फेरी काढून प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वापराबाबत होत असलेल्या दुष्परिणामाची माहिती नागरिकांना दिली. चौक बाजारमध्ये विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक, थर्माकोल या अविघटनशील वस्तू उत्पादन वापर विक्री हाताळणी व साठवणूक या विषयक शासनाने घातलेल्या प्लॅस्टिकबंदी व त्याच्या वापराबाबत करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईची माहिती पथनाट्याद्वारे सादर केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT