Udgir Corona Updates, Corona Report 
मराठवाडा

उदगीरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सात, संशयित चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह

हरी तुगावकर

लातूर  ः उदगीर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचे नमुने पॉझिटीव्ह आले होते. आता काही व्यक्तीची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता.२९) प्रलंबित असलेल्या तीन व आणखी एक अशा चार व्यक्तींचे कोरोना संबंधी स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे उदगीर येथील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर गेली आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी दिली.


येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत बुधवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत कोरोना बाह्यरुग्ण विभागात ४० व्यक्तींची तपासी करण्यात आली आहे. आतापर्यंत सहा हजार ५१४ व्यक्तींची तपासणी झाली आहे. यापैकी एकूण २१७ व्यक्तींची स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २०७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ता.चार एप्रिल रोजी आठ परराज्यातून आलेल्या आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते. हे रुग्ण बरे झालेले आहेत. दोन व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. आजपर्यंत १७६ जणांचा होम क्वारंटाईन कालावधी संपलेला आहे. २९ व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे. दोन व्यक्तीना या संस्थेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मंगळवारी (ता.२८) तीन व्यक्तींचे स्वॅबची तपासणी करण्यात आली होती व त्यांचे अहवाल प्रलंबित होते. आज त्या तीनही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. या पूर्वीच तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. आजपर्यंत उदगीर येथील १०५ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उदगीरमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या सात झाली आहे, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.
प्राथमिक तपासणी नंतर कोविड १९ आजारासारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित संशयित व्यक्तीचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात यावे किंवा जवळच्या कोविड केअर सेंटर येथे तपासणी करून घ्यावी. शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरीकांनी पालन करावे, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.

कौतुकास्पद...! प्लाझ्मा दान करण्यासाठी 'ते' आले पुढे

अद्याप शोध सुरुच
उदगीरमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या कोरोना संबंधीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पण ही महिला कोणाच्या संपर्कात आली आणि तिला कोरोना झाला याचा अद्याप शोध लागलेला नाही. याता तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र माने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT