nanded sakal
मराठवाडा

आता देगलूरचा सामना रंगणार

विधानसभा मतदारसंघाची ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक

अभय कुळकजाईकर

नांदेड : विधानसभेच्या देगलूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन नोव्हेंबरला मतमोजणी होईल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती.

निवडणूक आयोगाने देशभरातील एकूण ३३ मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर केल्या असून त्यात देगलूरचा समावेश आहे. देगलूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आठ ऑक्टोबरपर्यंत आहे. ११ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल.

२००९ मध्ये देगलूर - बिलोली हा राखीव मतदारसंघ झाला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे अंतापूरकर आमदार झाले. २००९ आणि २०१९ च्या निवडणुकीत अंतापूरकर यांनी साबणे यांचा तर २०१४ च्या निवडणुकीत साबणे यांनी अंतापूरकर यांचा पराभव केला होता. आजारपणामुळे आमदार अंतापूरकर यांना गेल्या मार्चमध्ये मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना नऊ एप्रिलला त्यांचे निधन झाले. त्यामुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT