3rajesh_20tope_201_0 
मराठवाडा

प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प, जालना पॅटर्न सर्वत्र राबविणार, आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

उमेश वाघमारे

जालना : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांपेक्षा अधिक खाट असलेल्या रूग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प  (प्लांट) उभा करण्याच्या सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी डीपीडीसीतून फंड घ्यावा किंवा आरोग्य विभागाकडून फंड दिला जाईल, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.१२) पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.


जालना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे ४० खाटांच्या अतिदक्षता कक्षाचे श्री.टोपे यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाचा विळखा वाढ असताना ऑक्सिजन गरज वाढ आहे. परंतु, राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून ऑक्सिजनच्या तुटवड्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यावर पत्रकारांनी आरोग्य मंत्री श्री. टोपे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांपेक्षा अधिक खाट असलेल्या रूग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचे आदेश स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी लागणारा फंड हा जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीमधून मंजूर करून घ्यावा किंवा आरोग्य विभागाकडून फंड दिला जाईल. मात्र, यापुढे पुर्वीच्या पद्धतीच्या ऑक्सिजन सिलेंडवर निर्भर राहून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प  उभारणे बंधनकारक केले आहेत. ज्या पद्धतीने जालना येथे लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प  सुरू करण्यात आला आहे. त्या पद्धतीने जालन्याचा लिक्विड ऑक्सिजन पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांसह भरारी पथके
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोविड आजाराचा समावेश केला असून या आजाराचे २० पॅकेज घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे पैसे खासगी रूग्णालयांना घेता येणार नाही. कोरोना आजारांच्या २० पॅकेजेस् वगळता इतर उपचारांचे पैसे द्यावे लागतात. परंतु, शासनाच्या निर्देशानंतरही खासगी रूग्णालयाकडून अधिक दराचे बिल घेतले जात असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्व अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः खासगी रूग्णालये तपासावीत, असे आदेश दिले असून खासगी रुग्णालये तपासणीसाठी भरारी पथक ही तैनात करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

IAS Anurag Yadav: तुम्ही असं बोलू शकत नाही... मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांशी भिडला आयएएस अधिकारी, कोण आहेत अनुराग यादव?

'हा' आहे जगात सगळ्यात जास्त विकला जाणारा मोबाईल; जाणून Samsung अन् Vivo ला आश्चर्याचा धक्का, भारतात किंमत एवढीशी की...

Sathankulam Custodial Death Case : धमक्यांना घाबरली नाही, वरिष्ठांचे कांड कोर्टात बेधडक सांगितलं; कोण आहे महिला पोलिस रेवथी?

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT