Latur Collector G.Sreekant, Sakal 
मराठवाडा

कृषी सेवा केंद्रांची दुकाने आता पाचच दिवस, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विकास गाढवे

लातूर  : राज्य सरकारने टाळेबंदीत परवानगी दिलेल्या कृषी सेवा केंद्र तसेच बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानांत होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या दोन्ही प्रकारच्या दुकानांवर बंधने आणली आहेत. त्यानुसार कृषी सेवा केंद्रांची दुकाने आता आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार पाच दिवस, तर बांधकाम साहित्याची दुकाने शनिवार व रविवार हे दोन दिवस सुरू राहणार आहेत. यासाठी सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ कायम ठेवण्यात आली आहे.


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. टाळेबंदीत पूर्वीपासून शेतीशी संबंधित व्यवसायाला परवानगी होती. मात्र, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रशासनाची ना हरकत घेण्याची अटकळ होती. अशीच अटकळ बांधकाम साहित्याबाबत होती. यामुळे परवानगी असूनही अनेक दुकाने प्रशासनाची नाहरकत नसल्याने सुरू झाली नव्हती. खरीप हंगाम तोंडावर आला असून अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी बांधकामे पूर्ण करण्याची गरज होती. शेतकरी व लोकांची निकड पाहता जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी गुरुवारी (ता.३०) आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार याबाबतचे आदेश काढले.

त्यानुसार कृषिविषयक अवजारे, यंत्र, खते, बी-बियाणे, कीटकनाशके विक्रीची दुकाने आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. यासोबत सिमेंट, प्लंबिंग, बांधकामासंबंधी तत्सम साहित्य मिळणारी हार्डवेअरची दुकानेही आठवड्यातील शनिवार व रविवार हे दोन दिवस सुरू ठेवता येणार आहेत. यासाठी दुकानदारांना निर्जंतुकीकरण, सुरक्षित शारीरिक अंतरासह अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT