Parking At Latur, Latur News 
मराठवाडा

पार्किंग सुविधा झाली, आता लातुरकरांची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या विविध बाजारपेठेत रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंधने घातली आहेत. त्यामुळे बुधवारी (ता.२०) या बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना चांगले फिरता आले. यातही काहींनी नियमांचा भंग करीत रस्त्यावरच वाहने उभी केली. ती वाहने पोलिस व महापालिकेच्या वतीने जप्त करण्यात आली. पार्किंगची व्यवस्था झाल्याने आता नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावण्यासोबतच शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.


गंजगोलाई परिसरात असलेल्या बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस व महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावरील वाहने हा सर्वांत मोठा अडथळा आता दूर करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातील गर्दी पाहून पहिल्यांदा ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बाजारात वाहने जाणार नाहीत याकरिता ठिकठिकाणी लोखंडी खांबही रोवण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारी येथील कापडलाइन, सराफलाइन सुरू होती. अनेकांनी पार्किंगचा वापर केला; पण काहींनी मात्र नियम तोडत रस्त्यावर वाहने उभी केली होती.

हे लक्षात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकांनी ही वाहने जप्त करण्याची कारवाई केली. आज बाजारात नागरिकांची गर्दी राहिली. ती आटोक्यात आणणे कोणालाही शक्य नाही. ईद होईपर्यंत कपडा बाजार जास्त दिवस सुरू ठेवून गर्दी कमी होईल का, याचाही विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. सध्या तरी नागरिकांनीच आता तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करीत बाजारपेठेत फिरण्याची गरज आहे.


महापालिकेच्या पथकावर रस्त्यांची जबाबदारी
गंजगोलाई परिसरात रस्त्यावर वाहने लावली जाऊ नयेत म्हणून महापालिकेच्या पथकावर रस्त्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यात हनुमान चौक ते सुभाष चौक या रस्त्याची क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, रवी कांबळे, अक्रम शेख यांच्यावर, सुभाष चौक ते गंजगोलाई या रस्त्यावर क्षेत्रीय अधिकारी शैला डाके, शिवराज शिंदे, प्रदीप गायकवाड यांच्यावर, हनुमान चौक ते गूळ मार्केट या रस्त्याची अभियंता घंटे, मुनीर शेख, मनोहर शिंदे, पंडित पवार यांच्यावर जबाबदारी आहे. हनुमान चौक ते गंजगोलाई या रस्त्याची क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, हिरा कांबळे यांच्यावर, गांधी चौक ते हनुमान चौक या रस्त्याची श्रीकांत शिंदे, प्रल्हाद शिंदे यांच्यावर तसेच मशीद रस्ता ते गंजगोलाई परिसर रस्त्याची क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, कलीम शेख, देवेंद्र कांबळे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sugarcane farmers : दहा साखर कारखान्यांकडे २८० कोटी थकीत; एफआरपीसाठी शेतकरी प्रतीक्षेत

Team India Cricket Schedule : ५ कसोटी, ९ वन डे अन् ८ ट्वेंटी-२०! टीम इंडिया घरच्या मैदानावर पुढील १२ महिन्यांत तगड्या स्पर्धकांना भिडणार...

Mumbai : १७ वर्षीय मुलानं भरधाव वेगात उडवलं, सायकलने जाणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

illegal weapons seized : ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई; खून प्रकरणातील गुन्हेगारांकडून पिस्तूल, एडक्यासह चाकू हस्तगत

SCROLL FOR NEXT