Latur Coronavirus Updates 
मराठवाडा

तपासणी नाक्यावरच होम क्वारंटाईनचा शिक्का, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात परजिल्ह्यातून व राज्यातून परवानगी घेऊन किंवा विनापरवानगी येणाऱ्यांमुळेच कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. दोन दिवसांत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांमुळे ही बाब प्रकर्षाने पुढे आल्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हा सीमेवरील तपासणी नाके सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचा समावेश असलेली पथके नाक्यावर चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्यांच्या दोन्ही हातावर नाक्यावरच होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे.


जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याला निलंग्यापासून सुरू होऊन ती उदगीरमध्येही कायम राहिली. आता कोरोनाचा संसर्ग विकोपाला गेला असतानाच लातूरसह जिल्ह्याच्या अन्य भागातही मुंबई, पुणे व ठाण्यावरून आलेल्या लोकांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पुढे आले. यामुळेच जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणीची गरज पुढे आली. यातूनच जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी रविवारी (ता.१७) रात्री आदेश काढत नाक्यावर चोवीस तास तपासणी पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पथकात तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसोबत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्थात शिकाऊ डॉक्टरांची शिफ्टनिहाय नियुक्ती होणार आहे. इंटर्नशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांची यादी संस्थेचे अधिष्ठाता लगेच देणार आहेत. हे पथक जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची नाक्यावरच तपासणी करणार (थर्मल स्क्रिनींग) आहे. यात परवानगी घेऊन येणाऱ्या लोकांसह परवानगी न घेता येणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर नागरिकांच्या दोन्ही हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरीच थांबण्याबाबत सक्तीच्या सूचना पथक करणार आहे. हे लोक खरोखरच घरी थांबतात की नाही, यावर गाव पातळीवरील कृती समितीचे पदाधिकारी नजर ठेवणार आहेत. घराबाहेर पडल्याचे आढळून आल्यास या लोकांकडून एक हजार रूपये दंड वसुल करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT