Latur Collector G.Sreekant, Sakal 
मराठवाडा

तुमची जास्तच गरज, अँटी कोरोनाच्या जवानांना जिल्हाधिकाऱ्यांची भावनिक साद

विकास गाढवे

लातूर  : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या तिसऱ्या लॉकडाउनमध्ये सरकारने शिथिलता आणली आहे. यामुळे गावपातळीवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली गावचे रक्षण करणाऱ्या अँटी कोरोना फोर्सचा (एसीएफ) उपक्रम बंद होणार असल्याच्या वावड्या उठल्या; मात्र आता तर तुमची खरी गरज आहे, अशी भावनिक साद घालत श्रीकांत यांनी ‘एसीएफ’च्या जवानांना आणखी सक्रिय होऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.


कोरोनाला जिल्ह्याबाहेर रोखण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहेत. त्यामुळे कोरोनाला घर व गावाबाहेर रोखण्याची खरी गरज होती. यातूनच कोरोनाला घराबाहेर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सुरू केलेला अँटी कोरोना पोर्सचा उपक्रम राज्यभर गाजला. यानंतर त्यांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी अँटी कोरोना फोर्सचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला ग्रामीण भागात उदंड प्रतिसाद मिळाला. दोनच दिवसांत तेरा हजारांहून अधिक युवक व ग्रामस्थांनी उपक्रमात सहभागी होऊन गावच्या सीमेवर पहारा देण्यास सुरवात केली. यामुळे कोरोना घेऊन छुप्या मार्गाने गावात दाखल होणाऱ्यांना चांगलाच पायबंद बसला. यामुळेच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.

उदगीरच्या निमित्ताने शहरी भागात मात्र, कोरोना चोरपावलाने दाखल झाला. त्यानंतर शहरी भागातही एसीएफचा उपक्रम सुरू झाला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून हजारो जवानांनी डोळ्यांत तेल घालून कोरोनाला रोखून धरले आहे; मात्र तिसऱ्या लॉकडाउनमध्ये सरकारने शिथिलता दिली. लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यासोबत विविध उद्योग व व्यवसायही सुरू केले. यामुळे लोकांचा वावर वाढला. यातूनच एसीएफचा उपक्रम बंद होणार असल्याच्या वावड्या उठू लागल्या. त्यावर जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आता तर उपक्रमाची खरी गरज असल्याचे सांगून जवानांनी वावड्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT