file photo 
मराठवाडा

नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल; विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जनतेने काळजी घेतली तर रुग्ण संख्या कमी होईल, निष्काळजीपणा केला तर रुग्णांची संख्या वाढेल त्यामुळे सर्वानीच काळजी घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता. पाच) हिंगोली येथे केले.

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयास त्यांनी भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

यावेळी श्री. केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करुन समाधान मानले. यावेळी त्यांनी व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या भेटी घेऊन सुविधे बाबत विचारपूस केली. योग्य आरोग्य सुविधा मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना केंद्रेकर म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी जनतेनेच काळजी घेतली पाहिजे तरच रुग्णांची संख्या कमी होईल. नागरीकांनी काळजी घ्यावी, लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यापुर्वी केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोरोना रुग्णाच्या चाचण्या वाढवाव्यात, पोलिस प्रशासनाने त्यांना दिलेल्या सुचना प्रमाणे कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या. जिल्हा परिषदेने सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे गाव या अभियानाकडे लक्ष द्यावे वृक्षलागवडीवर भर देण्याच्या सुचना त्यांनी  दिल्या. शहरातील रामलिला मैदान येथे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेट देऊन मैदानाचे कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या कामाचे कौतूक केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT