file photo 
मराठवाडा

कोरोना काळात वाचन करणारांची संख्या वाढली

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : गेल्या वर्षभरापासुन कोरोना संसर्गजन्य रोगाने देशासह राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने नागरिक स्वत: चे मन शांत ठेवण्यासाठी पुस्तकाचे वाचन करण्यावर भर देतांना दिसत आहेत.

एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. पुस्तकाचे एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि पुस्तकातील एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. जस शरीरासाठी दिवसांतून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. 

वाचन करणारा माणूस लवकर शांत झोपतो लवकर उठतो. वाचनामुळे माणूस नम्र होतो तर मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो. जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन. आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते. तुमच्या ध्येयावरुन तुमची लायकी पारखली जाते. आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते. ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय.

पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं. जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. 'कोरोना' या संसर्गजन्य रोगाने राज्याला जेरिश आणले आहे. राज्य शासनाला अनेक वेळा लाॅकडाऊनसारखे पर्याय आवलंबवावे लागले या काळात नागरिकांना घरि बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. या काळात नागरिकांनी वाचनावर भर दिला घरात होते नव्हते तेवढी पुस्तके वाचून काढली. जसे जमेल तसे इतरांकडून पुस्तके घेवुन वाचुन काढली. यामुळे नागरिकांचे मनोबल समतोल राहिले. पुन्हा कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे राज्यात लाॅकडावून लागले. या काळात घरात बसुन काय करावे असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांना लाॅकडाऊनच्या काळात शासनाने 'कोरोना'चे निर्बंध लावुन काही तास उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी.जेणे करून वाचन करणार्‍या नागरिकांना ग्रंथालयातुन पुस्तक घेवुन आपल्या घरी नेवुन पुस्तक वाचता येतील.
- महादेव आगजाळ, ग्रंथपाल, स्वामी रामानंद तिर्थ हिंदी- मराठी ग्रंथालय, सेलू जि. परभणी

संपादन प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT