beed crime beed crime
मराठवाडा

कोविड सेंटरमधील परिचारिकेवर घरात घुसून विनयभंग

लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये पिडीत परिचारिका कर्तव्य बजावते

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (बीड): तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरातील कोविड सेंटरमधील (covid center) एका परिचारिकेसोबत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याने दीड महिन्यापासून सतत पाठलाग करून त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी ( ता.२५ ) रात्री घरात घुसून विनयभंग केल्याच्या आरोपावरून अर्जून फड ( रा. दौंडवाडी) या कर्मचाऱ्यावर येथील ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तो अद्याप फरार आहे.

लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये पिडीत परिचारिका कर्तव्य बजावते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दीड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा दरवाजा रात्री -अपरात्री कोणीतरी ठोठावून जात होते. त्यांनी पाळत ठेवली असता त्यांच्या सोबतच काम करणारा अर्जून फड ( रा. दौंडवाडी) हा दरवाजा ठोठावताना आढळला .दुसऱ्या दिवशी पीडिताने अर्जुनला जाब विचारला असता तुमच्या बरोबर मला लग्न करायचे आहे, असे तो म्हणू लागला. आपण विवाहित असून यापुढे त्रास देऊ नको, असे पीडिताने त्यास बजावले होते तरीही अर्जुनने सतत पाठलाग सुरू ठेवला.

काहीही कारण सांगून तो त्रास देऊ लागला. मंगळवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजता पिडिता ड्युटी करून घरी परतली असता अर्जुनने घरात घुसून तिचा विनयभंग केला. यावेळी पिडिता आरडाओरड करताच अर्जुनने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि निघून गेला. या प्रकरणी पीडिताने येथील ग्रामिण पोलिस ठाण्यात अर्जुन विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT