Nutritious food has been stolen from the Anganwadi at Pokharni in Jintur taluka 
मराठवाडा

अंगणवाडीतील पोषण आहाराची चोरी : दोघे गजाआड तर एक फरार

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी) : चिमुकल्यांसाठीच्या पोषण आहाराची अंगणवाडीमधूनचोरी करणाऱ्यापैकी दोघांना पोलिसांनी शनिवारी (ता.३) गजाआड केले. त्यातील एकजण फरार झाला. तालुक्यातील पोखर्णी येथे दोन दिवसांपूर्वी झालेली ही चोरी शुक्रवारी (ता.) गावच्या पोलिस पाटलामुळे उघडकीस आली.

येथील अंगणवाडी मधील लहान मुलांसाठी ठेवलेले पोषण आहार चोरणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना बीट जमादार संगीता वाघमारे यांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवार (ता. 3) एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. यातील तिसरे आरोपी मात्र फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

बाल विकास सेवा अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांठी पुरविण्यात आलेले गहू, तांदूळ, चना, मसूरदाळ, साखर व अन्न शिजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंसह पोषण आहाराची पाकीटे अंगणवाडी सेविका उषा कांबळे यांनी ३१ मार्च रोजी येथील अंगणवाडीमध्ये  कुलुपबंद करून ठेवली होती. शुक्रवारी (ता.२) मध्यरात्रीच्या सुमारास गावातील तिघांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून आतील ३ हजार ७०५ रुपये किंमतीची यातील बहुतेक पाकीटे लांबविली.

हा प्रकार पोलिस  पाटील पंडित काचगुंडे यांना समजला असता त्यांनी शनिवारी (ता.३) सकाळी अंगणवाडी सेविकेला चोरांच्या नावासह  याबाबत माहिती दिली. त्याची खातरजमा केल्यानंतर अंगणवाडी सेविकेने जिंतूर येथे पोलिस ठाण्यात चोरी झाल्याचे कळविले असता बीट जमादार संगीता वाघमारे व पोलिस शिपाई उमेश चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन प्राप्त माहितीच्या आधारे पोषण मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र एकजण फरार झाला.

सदर प्रकरणी अंगणवाडी सेविका उषा कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच दिवशी (ता.३) सायंकाळी आरोपी मोकिंद खंदारे, कैलास काचगुंडे, रमेश बहिरट यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बीट जमादार संगीता वाघमारे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT