OBC Protest sakal
मराठवाडा

OBC Hunger Strike : आंतरवाली सराटीच्या जवळच ओबीसींचं उपोषण; जरांगेंचं आंदोलन सुरु असताना लक्ष्मण हाकेंकडून वडीगोद्रीत उपोषणाची घोषणा

आता कुठे छोट्या-छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटण्यास सुरवात झाली असुन त्यांचे हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. शासन पोलिसांच्या मदतीने आमचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे ओबोसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

-दिलीप पवार

अंकुशनगर (जि. जालना) : आता कुठे छोट्या-छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटण्यास सुरवात झाली असुन त्यांचे हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. शासन पोलिसांच्या मदतीने आमचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे ओबोसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

अंबड ते ओबीसीच्या बैठकीला जाताना ते वडीगोद्री येथे माध्यमांशी बोलत होते. लोकशाही आणि सदनशील मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत. हातामध्ये काठ्या, कुऱ्हाड्या घेऊन आंदोलन करत नाहीत. ओबीसी समाजाचे यापूर्वी तीन आंदोलन झाले आहेत. शासनाने याची दखल घेतली नाही. याचे आम्हाला दुःख आहे. शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते आहे. ओबीसी बांधवांची आज बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाईल. ओबीसींचा आवाज दाबण्याचा शासनाकडून प्रयत्न केला जाता आहे.

आंतरवाली सराटीमध्ये 60 टक्के ओबीसी समाज आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे आपण उपोषण करणार असून यावर ठाम आहोत, श्री हाके यांनी म्हटले. उपोषणा संदर्भात जी आम्हाला नोटीस दिली, ती जरांगे यांना नोटीस दिली का ? याचे उत्तर शासनाने द्यावे. शासन ओबीसी समाजाला जशी वागणूक देत आहे, तशी त्यांच्या बाबतीत आहे का? आम्ही उपोषणासाठी ठाम आंदोलनामध्ये तसूवर सुद्धा बाजूला हटणार नाही, असे ही श्री. हके यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT