jalna jalna
मराठवाडा

मराठा, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपचा जालन्यात चक्क जाम

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण व मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते

उमेश वाघमारे

जालना: स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द करण्यात आलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (ता.२६) भाजपच्या वतीने शहरातील अंबड चौफुली येथे चक्का जाम आंदोलन केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण व मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या दोन्ही आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडली नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी (ता.२६) शहरातील अंबड चौफुली येथे चक्का जाम आंदोनल करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान या चक्का जाम आंदोलनामुळे अंबड चौफुलीच्या चार ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंदोलकांनी रूग्णवाहिका, अंत्यविधीला मार्ग मोकळा करून दिला. या आंदोलना दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी- कोकणातील उष्णतेचा परिणाम हापूस आंब्यावर

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

Shendra MIDC fire: शेंद्रा MIDC हादरली! प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान?

SCROLL FOR NEXT