OBC leader Laxman Hake esakal
मराठवाडा

'सगेसोयरेची अंमलबजावणी झाल्यास फक्त OBC नाही, तर SC-ST आरक्षणालाही धोका'; लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली भीती

फोडा आणि झोडा ही जरांगेंची निती असून भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दिलीप पवार

शरद पवार मोठे नेते आहेत. ते देश पातळीवरचे नेते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन तरी करायला हवा, अशी खंत हाकेंनी बोलावून दाखवली.

अंकुशनगर : सगेसोयरेची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही, तर एसी आणि एसटीला देखील धोका आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी संपवण्याचा शासनकर्त्याचा घाट आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी सरकारवर केलाय. आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.

तुम्ही 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समजाचे? लोक नियुक्त सरकार घटनेशी फ्रॉड करत आहे. कोणती जात पुढारलेली आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. फुले-शाहू पुन्हा जन्माला येणार नाहीत, आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागेल, असं आवाहनही हाकेंनी ओबीसी बांधवांना केले.

आम्ही 27 टक्के आरक्षणात येतो. धनगर समाज मोठा, म्हणून छोट्या घटकांचे नेतृत्व आम्ही करू, इंग्राजांची तोडा-फोडा निती जरांगेंनी सोडावी. पवार साहेब प्रोफेशनल नेते. मी ज्या भागात उपोषण करतोय, त्या भागातील लोकप्रतिनिधींनी एकतरी फोन करायला हवा होता, असा टोला आमदार राजेश टोपेंना त्यांनी लगावला.

शरद पवार मोठे नेते आहेत. ते देश पातळीवरचे नेते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन तरी करायला हवा, अशी खंत हाकेंनी बोलावून दाखवली. जरांगेंना माहिती आहे का? धनगर समाज ओबीसीमध्ये येतो म्हणून, आमचे धनगर नेत्यांचे ओबीसीचे आरक्षण टिकले पाहिजे. फोडा आणि झोडा ही जरांगेंची निती असून भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जांचा पाऊस! ५ हजार घरांसाठी ९८७२० अर्ज, 'या' तारखेआधीच भर फॉर्म

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पावसाची संततधार सुरूच! पनवेलमधील शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहीर

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

SCROLL FOR NEXT