On the occasion of Shivaji Maharaj Jayanti a little girl give a speech and says something to Prime Minister Modi
On the occasion of Shivaji Maharaj Jayanti a little girl give a speech and says something to Prime Minister Modi 
मराठवाडा

'मोदीजींनी महाराजांचा गनिमी कावा आठवावा'

सुशांत सांगवे

लातूर : ''मोदीजींना माझे एकच सांगणे आहे, त्यांनी शिवाजी राजांची गनिमी काव्याची युद्धनीती आठवावी. पाकिस्तानात घुसून दहशतवाद मुळापासून उखडून टाकावा. म्हणजे पुन्हा भारतातील कोणावर आपला भाऊ, कोणावर मुलगा गमावण्याची वेळ येणार नाही,'' असे सांगत सहा वर्षाच्या एका चिमुकलीने अनेकांच्या मनातील भावनाच व्यक्त केल्या.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौक परिसरात शिवभक्तांची अलोट गर्दी जमली आहे. दुचाकी रॅली, ढोल-ताशा वादन, त्यावर होणारी फुलांची उधळण, पोवाड्याचे सादरीकरण असे उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी वातावरण येथे पाहायला मिळत आहे. त्यातच प्रिया हवा पाटील या चिमुकल्या विद्यार्थिनीने भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती बालसंस्कार केंद्रात पूर्व प्राथमिक वर्गात शिकत आहे.

प्रिया म्हणाली, ''मी दररोज टीव्हीवर पाहते आहे. तुम्हालाही माहिती आहेच, पुलवामामध्ये 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले. यात कोणीतरी कोणाचे तरी बाबा होते, कोणाचा तरी मुलगा होता. त्यांच्या घरी माझ्यासारखीच लहान मुलं असतील. आई असेल. काय वाटत असेल त्यांना... कुटुंबावर काय प्रसंग आला असेल.. म्हणून आजच्या शिवजंतीच्या निमित्ताने माझी मोदीजींना विनंती आहे, त्यांनी गनिमी कावा आठवावा." 

लाखो सर झुक जायेंगे आपके सन्मान में, बस एक बार उनको अपनी ताकद दिखा दो... अशी घोषणाही प्रियाने जवानांसाठी दिली. तिचे भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT