bribe
bribe 
मराठवाडा

अभय केंद्राचा अधिकारी लाचेच्या जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षणाचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी दोन हजाराची लाच घेणारा लाचखोर संरक्षण अधिकारी अमोल पाटील याला एसीबीच्या पथकांनी रंगेहात पकडले. ही कारवाई देगलूर येथे गुरूवारी (ता. 7) दुपारी करण्यात आली. 

देगलूर तालुक्यातील एक कौटुंबिक पिडीत महिला न्याय मागण्यासाठी देगलुर येथील महिला बालविकास अंतर्गत चालणाऱ्या अभय केंद्रात गेल्या. तेथील अधिकारी अमोल पाटील याला आपली माहिती दिली. तसा रितसर तीने प्रस्ताव सादर केला. परंतु लाचेच्या आहारी गेलेल्या अमोल पाटील यांने तिला देगलूर न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली. अगोदरच त्रस्त असलेल्या महिलेनी थेट नांदेड येथे येऊन 31 जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पाटील विरोधात तक्रार दिली. यावरून पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकामार्फत लाचेच्या मागणीचा पडताळणी सापळा लावला.

पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुरूवारी (ता. 7) देगलूरच्या अभय केंद्र परिसरात सापळा लावला. दोन हजाराची लाच घेतांना या सापळ्यात अमोल सर्जेराव पाटील मुळ रा. नगररोड, पंचायत समितीच्या मागे बीड याला रंगेहात अटक केली. त्याच्या विरूध्द देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक संजय लाटकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या आदेशावरून पोलिस उपाधइक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या पथकांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT