मराठवाडा

बसच्या चाकाखाली चेंगरून आष्टीत वृद्धा मृत्युमुखी

सकाळवृत्तसेवा

आष्टी (जि. बीड) : बस आल्याचे धावत निघालेली वृद्धा चालकाला दिसून न आल्याने पुढील चाकाखाली आल्याने चेंगरून जागीच ठार झाली. शहरातील लिमटाका चौकात शुक्रवारी (ता. 21) दुपारी ही घटना घडली. लक्ष्मीबाई बापूराव हंबर्डे (वय 70 वर्षे, रा. हंबर्डेवस्ती, आष्टी) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

लक्ष्मीबाई हंबर्डे या तालुक्यातील भवरवाडी येथे मुलीकडे जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या. चिंचोली बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी भवरवाडी फाट्याचे तिकीट मागितले. मात्र, चिंचोली बस या मार्गे जात नसल्याने बसचालकाने त्यांना लिमटाका चौकात उतरा, तेथून तुम्हाला भवरवाडीकडे जाणारी बस मिळेल, असे सांगून लिमटाका चौकात उतरविले. त्यामुळे लक्ष्मीबाई या लिमटाका चौकात बसची वाट पाहात थांबल्या. 
थोड्या वेळाने आष्टी आगाराची आष्टी-पाटसरा-पाथर्डी (क्र. एमएच20, बीएल0632) ही बस लिमटाका चौकात आली.

थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या लक्ष्मीबाई यांना अन्य प्रवासी बसमध्ये चढताना दिसले. बस चुकून जाऊ नये म्हणून पळत निघाल्या. बसच्या पुढील बाजूने आल्याने हे बसचालक खाडे (पूर्ण नाव नाही) यांच्या लक्षात आले नाही. वाहकाने बेल देताच बसचा दरवाजा लावून घेतल्यानंतर त्याने बस सुरू करून थोडी पुढे नेल्यानंतर लगेचच लक्ष्मीबाई या चाकाखाली चेंगरल्या. बसचे चाक मान व तोंडावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT