Omicron Virus esakal
मराठवाडा

Omicron : चिंता वाढली! उस्मानाबादेत ओमिक्राॅनचे दोन रुग्ण,प्रशासन सतर्क

लातूरनंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सयाजी शेळके

उस्मानाबाद : लातूरनंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बावी (ता.उस्मानाबाद) येथे ओमिक्रॉन (Omicron) कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळून आले आहेत. शारजा येथून तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर (Omicron In Osmanabad) त्याची बुधवारी (ता.१५) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली आहे. चार दिवसांपूर्वी त्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात (Osmanabad) आला होता. (omicron in osmanabad two patients found in district)

बुधवारी या दोघांचाही अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बावी गावातील सीमा सील केल्या आहेत. तसेच गावातून इतर ठिकाणी संसर्ग होऊ नये. याची प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे. मराठवाड्यात लातूर येथील ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ही दोन पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT