संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

गोवा ट्रीपवर गेलेला विलगीकरण कक्षात दाखल

सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्हा सामान्य रूग्णालयात मंगळवारी (ता.१७) पुन्हा एका संशयित रुग्णास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गोवा ट्रीपवर गेलेल्या एका महाविद्यालयातील युवकास दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यासोबतच्या इतर ३४ जणांची जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूंची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही. मात्र, त्यांना होम कोरन्टाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. 

गोवा ट्रीपवर गेलेल्या महाविद्यालयीन युवकास सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने तो सोमवारी (ता.१६) जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी आला होता. तेथे ऑस्‍ट्रोलियन पर्यटकांच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याच्या लाळेचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

चीनहून आलेल्याचे पुन्हा पाठविले नमुने

दरम्यान मंगळवारी चीनहून प्रवास करून आलेल्या एका रुग्णास कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोलकात्ता येथे यापूर्वीच तपासणी झाली असून अहवालही निगेटिव्ह आला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याचे नमुने पुन्हा एकदा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यास विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

थायलंडहून परतलेल्यांची  तपासणी

तसेच ता.५ मार्च रोजी थायलंडहून पाच व्यक्ती जिल्ह्यात परतल्या असून त्यांचीही आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाही. त्यांनाही होम कोरन्टाईन करण्यात आल्याची माहिती श्री बिनवडे यांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT