haji abdul habib bagwan sakal
मराठवाडा

Accident : बोलोरो जीप अपघातात बाळापूर जवळ एकाचा मृत्यू

बोलेरो जीपचा अपघात होऊन जीप पलटी झाल्याने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले होते.

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर - कांडली, ता. कळमनुरी, जि. हिंगोली फाट्याजवळ सोमवार ता. २९ संध्याकाळी एका बोलेरो जीपचा अपघात होऊन जीप पलटी झाल्याने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना अपघातातील हिंगोली येथील प्रसिद्ध संत्रा व्यापारी हाजी अब्दुल हबीब बागवान राजा यांचे निधन झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, आखाडा बाळापूर पासून जवळच असलेल्या कांडली फाट्याजवळ आखाडा बाळापूर पोलीस स्थानक अंतर्गत असलेल्यां वारंगा रस्त्यावर नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्ग १६१ वर सोमवारी आपल्या बोलेरो जीप मधून नांदेड येथे महत्वाची कामे आटोपून हिंगोली कडे जात असताना बोलोरो जीपला आखाडा बाळापूर जवळील कांडली फाटा उड्डाण पूलावर हा अपघात झाला, अपघात एवढा गंभीर होता की बोलेरो जीप पलटी झाली होती त्यांना ताबडतोब घटना स्थळावरून जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये हिंगोली येथील राजा फंक्शन हॉलचे मालक व प्रसिद्ध संत्रा व्यापारी हाजी अब्दुल हबीब बागवान उर्फ राजा वय ६२ वर्ष यांचे निधन झाले तर त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक व चालक गंभीर जखमी झाले व त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदरील अपघातची आखाडा बाळापूर येथील पोलीस स्थानक मध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती..मयत हाजी हबीब बागवान राजा हे प्रसिद्ध व्यापारी असल्याने घटनास्थळी त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

मागील काही दिवसापासून काडली फाटा व उड्डाणपूल चे काम झाल्याने काडली कडे जाणाऱ्या अनेक जण जवळ पडत असल्याने दुचाकी स्वार व चारचाकी चालक विरुद्ध दिशेने जात असल्याने यातून यापूर्वी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत यावर संबंधितांनी (रॉंग साईड ) विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT