gas cylendar spoth
gas cylendar spoth 
मराठवाडा

हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्‍फोट एक जण जखमी 

प्रभाकर बारसे

गिरगाव(जि.हिंगोली): वसमत तालुक्‍यातील बागल पार्डी येथे गॅस सिलेंडरचा स्‍फोट होऊन एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.१९) दुपारी एक वाजता घडली. यात संसरोपयोगी साहित्यासह अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

वसमत तालुक्‍यातील बागल पार्डी येथे राहुल खिराडे यांचे राहत्या घरी किराणा दुकान आहे. गुरुवारी सकाळी त्‍यांच्या दुकानातील फ्रीज दुरुस्‍तीचे काम सूरू होते. या वेळी लाईटर सुरू करताना फ्रीजने पेट घेतला. लागलेली आग विझविण्याचा प्रयत्‍न दुकानदार व दुरुस्‍तीसाठी आलेल्या कारागिराने केला. मात्र आग आटोक्‍यात आली नाही. आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे लागूनच असलेल्या घरातील साहित्याने पेट घेतला. घरात असलेल्या त्‍याच्या कुटुंबीयानी घराबाहेर धाव घेतली. 

आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न

त्यानंतर आरडाओरडा सुरू केला. ही आग गॅस सिलेंडरपर्यंत पोचली. यात गॅस सिलेंडरचा मोठा स्‍फोट झाला. त्यामुळे घरातील साहित्यासह धान्य, घरावरील टीनपत्रे जळून खाक झाली. यावेळी चंद्रकांत बागल, विजय नरवाडे, राहुल कुरुडे, भगवान इंगोले आदी गावकऱ्यांनी पाणी घेऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसराताच सर्व गावकरी घटनास्‍थळी धावून आले. दरम्‍यान, राहुल खिराडे यांच्या पाय व हात आगीत भाजल्याने त्‍यांना उपचारासाठी कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

साळवा येथे ट्रक उलटून दोघे जखमी

खाडा बाळापूर: आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर साळवा पाटी येथे कोंबडीचे खाद्य घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीकडून नांदेडकडे कोंबडीचे खाद्य घेऊन जाणारा ट्रक (एपी १६ टीवाय ६६३९) साळवा पाटीजवळ आला असताना खड्डा चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातामध्ये चालक नागेश चंद्रहार (रा.विजयवाडा) व क्लिनर शेख फिरोज शेख नागूर हे दोघे जखमी झाले.

येथे क्लिक कराहिंगोलीच्या बस, रेल्वेस्थानकात शुकशुकाट
 
पोलिसांनी केली वाहतूक सुरळित
 
अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास थोरात, जमादार संजय मार्के, बाबूराव चव्हाण, राजेश जाधव, राजू मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी थांबून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT