File photo
File photo 
मराठवाडा

सहा आसनी रिक्षा उलटून एक ठार

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (उस्मानाबाद) : गुलबर्गा-लातूर मार्गावर सहा आसनी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उमरगा-लातूर रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर घडली.


याबाबतची माहिती अशी, की सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संतोष मकदूम लिंबुळे (वय 40), गंगूबाई तम्मा लिंबुळे (वय 68, रा. दोघेही तुरोरी, ता. उमरगा) हे सहा आसनी रिक्षाने (एमएच-25, एन-805) उमरग्याकडे येत असताना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर उलटून झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते.

जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात तातडीने त्यांना दाखल करण्यात आले. या अपघातात चालक संतोष लिंबुळे याचा मृत्यू झाला असून, गंगूबाई लिंबुळे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT