One killed, five injured in accident At Waluj 
मराठवाडा

वाळूज : कार्यकर्त्यांची कार उलटली; एक ठार, पाच जखमी

आर. के. भराड

वाळूज (जि. औरंगाबाद) - चालकाचा ताबा सुटल्याने एक कार शेतात जाऊन उलटली. यात कारमधील एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 19) रात्री सव्वाबाराच्या सुमारास दहेगाव बंगला जवळ घडली. विजय रमेश पारदे (वय 30 रा. मुरमी, ता. गंगापूर) असे मृताचे नाव आहे. यामध्ये शाकीर पटेल (27), सुदाम पारदे (32), मच्छिंद्र म्हस्के (28), विठ्ठल साठे (29) आणि बाळू सुराशे (27) (सर्व राहणार मुरमी) हे जखमी झाले. 

हे सर्व जण गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदार संघातील एका अमेदवाराचा प्रचार करून कारने (एमएच 12, एचएफ -4494) लिंबेजळगांवकडून मुरमीकडे जात होते. ही कार दहेगाव बंगल्याजवळ येताच चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार चार पाच पलट्या खात थेट शेतात जाऊन उलटली. यात कारमधील चालकासह सर्व सहा जण जखमी झाले.

गणेश राऊत यांनी अपघाताची माहिती पोलिसांना देऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली; मात्र जखमींपैकी विजय पारदे यांचे प्राण वाचू शकले नाहीत. जखमींवर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून, शाकीर पटेल याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे पुढील तपास करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT