dhrmabad.jpg 
मराठवाडा

वाढदिवसाचा खर्च टाळून एक लाखाची मदत

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि.नांदेड) ः सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त असून भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर धर्माबाद शहरातील सोन्या - चांदीचे व्यापारी पांपटवार ज्वेलर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी (ता. एक) गिरीष पांपटवार व मुलगी अक्षिता गिरीष पांपटवार या दोघांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या लढ्याला एक लाख ११ हजार रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीत करण्यात आली आहे.

लढ्यासाठी आर्थिक मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढ्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापारी पांपटवार ज्वेलर्सचे मालक गिरीष पांपटवार व त्यांची मुलगी अक्षिता गिरीष पांपटवार या दोघांच्या वाढदिवसाचा खर्च कोरोना लढ्यासाठी पंतप्रधान सहायता निधी म्हणून एक लाख ११ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे सुपूर्द केला. पांपटवार ज्वेलर्सच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी उद्योजक सुबोध काकाणी, रामचंद्र पाटील बाळापूरकर, चंद्रकांत पाटील बाळापूरकर, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, संतोष पांपटवार, गोविंद झंवर, संतोष लुहाडे यांची उपस्थिती होती.

कोरोना विषाणू विरुद्धचा लढा मोठा आहे. आपल्या देशाला आरोग्य, आर्थिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर लढावे लागणार आहे. आम्ही आमच्या परीने मदत केली आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी या संकटात पंतप्रधान सहायता निधीत आर्थिक मदत करावी. प्रत्येकाने लॉकडाउनच्या काळात घरात बसून सरकारी सूचनांचे पालन करावे. या संकट काळात घरात बसणे व सरकारी सूचनांचे पालन करणे ही एक देशसेवाच आहे, असे सुप्रसिद्ध सोन्या - चांदीचे व्यापारी गिरीष पांपटवार यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT