वसमत क्राईम न्यूज  
मराठवाडा

देशी, विदेशी दारुसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त- वसमत ग्रामीण पोलिसांची कारवाई

वसाहतींमध्ये सतिश प्रकाश मणी यांच्या घरी छापा मारुन विदेशी दारुच्या १७ बाॅटल व दुचाकी असा ४७ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : पुर्णा कारखाना वसाहतींमध्ये दोन ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये देशी व विदेशी दारुसह ९६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई वसमत ग्रामीण पोलिसांनी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पुर्णा कारखाना वसाहतींमध्ये अनाधिकृत देशी व विदेशी दारु विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलिस नाईक एम. व्ही. आडे यांनी शनिवारी सायंकाळी पुर्णा कारखाना वसाहतींमध्ये सापळा रचून शेख खाजा शेख अमिन याच्या घरात अनाधिकृत देशी दारुच्या २९ बाॅटल व एक दुचाकी असा मिळून ४६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर याच वसाहतींमध्ये सतिश प्रकाश मणी यांच्या घरी छापा मारुन विदेशी दारुच्या १७ बाॅटल व दुचाकी असा ४७ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही छाप्यात मिळून ९६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - याप्रकरणी कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनोळखी हॅकर्सविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

दारुबंदी विभागाच्या कार्यालयाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष.....

शहरात शासनाचे दारुबंदी विभागाचे कार्यालय असताना तालुकाभरात मोठ्या प्रमाणात देशी- विदेशी दारुचा अनाधिकृत पुरवठा कसा होतो यावर नागरीकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यापुर्वीही याच भागात ग्रामीण पोलिसांनी छापा मारुन लाखो रुपयांची अनाधिकृत दारु जप्त केली होती. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागात अनाधिकृत देशी व विदेशी दारु विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरीकामधुन केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT