Udgir Corona Updates, Latur 
मराठवाडा

Breaking News ः उदगीरमध्ये आणखी एक जण कोरोनाबाधित

सुशांत सांगवे

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये दिवसाआड कोरोनाची लागण झालेले रुग्ण समोर येत होते. पण, गेल्या दोन-तीन दिवसांत दररोज कोरोनाची लागण झालेले रुग्ण समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एकाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उदगीरमधील कोरोनाबाधितांची संख्या आता १४ झाली आहे. या सर्वांवर उदगीरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी मंगळवारी (ता.पाच) दिली.


उदगीरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर उदगीरमध्ये आणखी कोणाकोणाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे, याची तपासणी दररोज केली जात आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत झालेल्या तपासणीत उदगीरमधील १३ व्यक्तींना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यातच आता आणखी एकाची मंगळवारी भर पडली. संस्थेतील प्रयोगशाळेत आज एकुण १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उदगीरमधील उपजिल्हा रुग्णालयातून एकुण आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.

त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका व्यक्तींचा अहवाल अंतिम आला नसल्यामुळे त्यांची ४८ तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे आणि उर्वरित सहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याबरोबरच बीड येथील ९ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वच ९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. ठाकूर आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.विजय चिंचोलकर यांनी दिली.

सात जणांच्या साक्षीनेच लग्नाचे सात फेरे, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दिवसभरात ६५ जणांची तपासणी
संस्थेत आज मंगळवारी (ता.पाच) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत कोरोना बाह्यरुग्ण विभागात एकुण ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तर आजपर्यंत एकुण २३० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून यापूर्वीच चार एप्रिल रोजी ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातून सोडण्यात आले. आजपर्यंत २०० व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी संपला असून एकुण २० व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच, १० व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

आकडेवारी
लातूर : २३
उपचार सुरू : १४
बरे झालेले : ०८
मृत्यू झालेले : ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Hasan Mushrif Reaction : गोकुळचा अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया; महायुतीतील भांडणांवर भाष्य; ‘आम्ही निकाल स्वीकारला’

मुंबई ते राजस्थान, व्हाया सुरत! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईतून कसे पसार झाले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

46 Fours, 7 Sixes अन् नाबाद ४०० धावा! Ranji Trophy मध्ये चिन्मय सुतारचा पराक्रम; ७७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

Housing Society: हाउसिंग सोसायटीच्या कामांना द्या गती!

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

SCROLL FOR NEXT