bajar 
मराठवाडा

तीन दिवसांच्या बंदनंतर गर्दीची एकच झुंबड, कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात कोरोनाचा एक पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून शहरात लॉकडाउन कडक करण्यात आले होते. शहरातील औषधी दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहने देखील मनाई करण्यात आली होती. नागरिकांना त्‍याला प्रतिसाद दिला होता. त्‍यानंतर सोमवारी (ता.सहा) सकाळी नऊ ते एक या वेळात लॉकडाउन शिथिल करण्यात आले होते. यामुळे शहरात आठ ठिकाणी भरलेल्या बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

जिल्‍ह्यात कोरोनाचा एक रुग्ण पॉझीटिव्ह असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गर्दी करू नये यासाठी तीन दिवस औषधी दुकाने वगळत इतर दुकाने तसेच दिवसाआड भरणारा बाजार देखील बंद केला होता. कोरोनाच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या भीतीने शहरील सर्वच गल्‍लीबोळातील रस्‍ते नागरिकांनी स्‍वतःहा बंद करून बाहेरून येणाऱ्यांसाठी बंद केली होते. यामुळे तीन दिवस शहरात कडकडीत बंद होता. प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य केले.

काही ठिकाणी पाळले नियम
सोमवारी लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर सकाळी नऊ ते एक यावेळात शहरात पालिका प्रशासन व जिल्‍हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या आठ ठिकाणी बाजार भरला होता. तर शहरातील किराणा दुकाने इतरही दुकाने उघडण्यात आली होती. शहरात भरलेल्या बाजाराच्या ठिकाणासह गांधी चौक, सदरबाजार, कपडा मार्केट, किराणा दुकानावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी मास्‍क, नाकातोंडाला रुमाल बांधून सोशल डिस्‍टन्स ठेवत दुकानात खरेदी केली तसेच एटीएमवर देखील सोशल डिस्‍टन्स ठेवत व्यवहार केले. यासाठी प्रशासनाचे अधिकारी, पोलिस अधिकारी कर्मचारी जागोजागी लक्ष ठेवून होते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील हे स्‍वतः बाजाराच्या ठिकाणी जावून नागरिकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते.

जिल्‍हाधिकारी उतरले रस्‍त्‍यावर...
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आज शासकीय विश्रामगृहासमोर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून दुचाकी तीन चाकी, चार चाकी वाहनांची स्वतः तपासणी केली आणि प्रत्यक्षात अनेक वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या वेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT