corona.jpg 
मराठवाडा

स्वतःची काळजी हाच उपाय ः आमदार शिंदे

हफिज घडीवाला


कंधार, (जि.नांदेड) ः अल्पावधीतच कोरोनाने जगाला वेढा घातला आहे. या जीवघेण्या रोगाला संपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत आहे. आशा वेळी प्रशासनाला सहकार्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे स्पष्ट करून आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी स्वतःची काळजी हाच कोरोनवर प्रथम उपाय असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी जनतेला चिंतामुक्त राहण्याचे आवाहनही केले.

कामाचा आढावा

आमदार शिंदे यांनी नुकतीच कंधार व लोहा तहसीलला भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी अन्नधान्याचा तुटवडा पडू नये व लोकांची हेळसांड होऊ नये यासाठी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी घेतली.

जगभरात चिंतेचे वातावरण

जगभरात अत्यंत कमी दिवसांत कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून जगभरात या रोगाने हजारो लोकांचा जीव घेतला आहे. अद्यापपर्यंत तरी या भयानक रोगावर रामबाण इलाज निघाला नसल्याने भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या जीवघेण्या रोगापासून सावध व सुरक्षित राहण्यासाठी स्वतः व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणे देशातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी लोहा-कंधार मतदारसंघातील व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरातच राहावे, हाच या रोगाला नियंत्रित करण्याचा रामबाण इलाज असल्याचे आमदार शिंदे सूचित केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. येणारे १५ ते २० दिवस प्रत्येक नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचे आहेत. यासाठी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर निघू नये, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. येणाऱ्या दिवसांत आपले सहकार्य या जीवघेण्या रोगाला रोखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने खबरदारीसाठी व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच राहावे व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: DA वाढीनंतर कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या 3 मोठ्या मागण्या! महागाई भत्ता आणि बेसिक पगारात काय बदल होणार?

India vs Pakistan Live Score : भारताचा लाजीरवाणा पराभव, पाकिस्तानने २३ चेंडूंत ९१ धावा करून जिंकली मॅच; कृणाल पांड्याच्या एका षटकात ३१ धावा

Tukaram Mundhe: मसाले विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

राशिद खानचा ऐतिहासिक विक्रम! T20 क्रिकेटमध्ये 'दुहेरी शतक' करणारा जगातील पहिलाच फिरकीपटू; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

'Samsung W27' ची बाजारात दणक्यात एंट्री! दोन डिस्प्ले, 200MP कॅमेरा आणि तगडा लूक; फोल्डेबल फोनची भन्नाट फीचर्स एकदा पहाच...

SCROLL FOR NEXT