Uddhav Thackeray sakal
मराठवाडा

Sengaon News : अवयव विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी गाजवली मुंबई; ‘त्या’ शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

सेनगाव तालुक्यातील अवयव विक्रीला काढून मुंबईत गेलेल्या त्या दहा शेतकऱ्यांनी सरकार दखल घेत नसल्याने मुंबईतील समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव - तालुक्यातील अवयव विक्री करणाऱ्या दहा शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर बाहेर येताच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शुक्रवारी भेट घेऊन आमच्यावर अवयव विक्रीची वेळ का आली, याबाबत चर्चा केली.

सेनगाव तालुक्यातील अवयव विक्रीला काढून मुंबईत गेलेल्या त्या दहा शेतकऱ्यांनी सरकार दखल घेत नसल्याने मुंबईतील समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे गुरुवारी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी लवकरच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांना ठाकरे यांनी सांगितले.

काय आहे प्रकार?

गेल्या काही दिवसांपूर्वी पीककर्जावरून सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले होते. एवढेच नाही तर ते विक्री करण्यासाठी मुंबईतही गेले. मात्र, त्या ठिकाणी त्यांची कुणीही दखल घेत नसल्यामुळे त्यांनी मुंबईतील समुद्रात जलसमाधी घेण्याचा कठोर निर्णय घेतला होता. यामुळे गुरुवारी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

शेतकऱ्यांनो अवयव विक्रीचा विचार करू नका. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या. कृषिमंत्र्यांनी कुठल्याही एका घरात बसून काम करावे. घटनाबाह्य सरकारला ताकद दाखवून द्या. पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई द्या. या सरकारने जबाबदारी घेतली आहे तर ती जबाबदारी पार पाडा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.

- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali 2025: ट्रम्प टॅरिफचा दिवाळी फराळाला फटका! परदेशातून मागणीत घट; महागाईनेही खिशाला कात्री

विराट कोहली IPL मधूनही निवृत्ती घेतोय? RCB सोबत 'करार' करण्यास नकार, माजी खेळाडूने कारण समजावून सांगितलं...

Nagpur ZP Reservation: जिल्हा परिषदेच्या ५७ गटांची आज आरक्षण सोडत; प्रस्थापितांना धक्का की मिळणार अभय?

Diwali 2025 Gift Idea: यंदा दिवाळीत द्या अनोखे गिफ्ट, कमी खर्चात नातेवाईक अन् मित्रांना करा खुश

Pakistani Women Arrested : त्रिपुरात संशयित पाकिस्तानी महिलेला अटक; झेन-झी आंदोलनाचा गैरफायदा घेऊन नेपाळच्या तुरुंगातून पळाली अन्...

SCROLL FOR NEXT