file photo 
मराठवाडा

हिंगोलीत राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन

राजेश दारव्हेकर

 हिंगोली :  महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणीपुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयावर आधारित राज्यस्तरीय बोधचिन्ह निर्मिती स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वछता विभागाने केले आहे .या स्पर्धेत व्यक्ती, विद्यार्थी, संस्था यांना सहभागी होता येणार असल्याची माहिती पाणी व स्वछता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी दिली आहे.

बोधचिन्ह निर्मिती स्पर्धेचा कालावधी हा (ता. ३०) सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. लोगो पाणीपुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाचा सहज बोध होईल असा असावा तसेच बोधवाक्य हे मराठीतून असले पाहिजे स्पर्धेत विद्यार्थी, व्यक्ती ही संस्था जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील लोगो अंतिम करण्याचे अधिकार राज्य व पाणी स्वच्छता मिशन विभागाला असतील, सहभागी सस्पर्धकांनी लोगोची सॉफ्ट कॉपी तसेच स्पर्धकाची पूर्ण माहिती, पूर्ण नाव ,पत्ता ,(directorwsso@gmail.com, (  iecwsso@ gmail.com)  संपर्क क्रमांक आदी माहिती आणि या मेल आयडीवर पाठवण्यात यावे. ज्या स्पर्धकाची निवड  होईल त्यांना पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक राज्य स्तरावर देण्यात येईल.

ता. ३० सप्टेंबर अखेर दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवेशिकेचा विचार केला जाणार आहे .बोधचिन्ह निर्मितीचा स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी व व्यक्ती संस्था जाहिरात संस्था यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे आवाहन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Violence: निकालानंतर कोलकात्यात थरार! टीएमसी कार्यालयावर बुलडोझर, रस्त्यांवर भीषण गोंधळ; VIDEO व्हायरल

Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा

Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..

Nira Canal Accident: नीरा कालव्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचवताना दोघे कालव्यात वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता, पोहता न आल्याने घात!

६५ वर्षांत २० मुख्यमंत्री बदलले, त्यातील फडणवीस यांनी सोलापूरच्या तरुणांना दिले ‘हे’ गिफ्ट; गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदा सुरु होणार ३ अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT