corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

Corona Update : उस्मानाबादेत आज १७४ पॉझिटिव्ह, आत्तापर्यंत ५१४ जणांनी केली कोरोनावर मात 

तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  जिल्ह्यामध्ये शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये १७४ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. एकूण रुग्णाची संख्या आता एक हजाराच्या वर गेली आहे. एक हजार १६३ रुग्णामध्ये बरे झालेले रुग्ण ५१४ तर सध्या उपचार घेतलेले असलेल्या रुग्णाची संख्या ६०० वर पोहचली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ४९ जणाचे मृत्यू झाले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे गूरुवारी (ता.३०) रोजी ५०८ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५०३ अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. यामध्ये १७४ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील अडीचशे संशयित निगेटिव्ह आले आहेत. अजूनही पाच रुग्णाचे अहवाल येणे बाकी आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील ४९, उमरगा ४७, तुळजापूर ३५, कळंब २१, वाशी १४, परंडा सहा, लोहारा दोन अशा १७४ जणाचा समावेश पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश झाला आहे.

उस्मानाबाद शहरामध्ये राम नगर सहा, समता नगर एक, पोलीस लाईन दोन, गवळी वाडा एक, दत्त कॉलनी एक, शाहु नगर दोन, भीम नगर दोन, काकडे प्लॉट एक, एम.आय.डी.सी एक, धनेश्वर नगर एक, गालीब नगर एक, ओम नगर एक, खाटीक गल्ली एक, टीपीएस रोड एक, तांबरी विभाग एक, बार्शी नाका चार, राजामाता जिजाऊ मुलींचे वसतीगृह नऊ, उंबरे कोठा एक, विद्यानगर तीन, सांजा चौक एक, सावरकर चौक एक आदी ठिकाणचे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच चिंचोली, पिंपळवाडी, येडशी, ढोकी,तुगाव आदी गावामध्येही रुग्ण सापडले आहेत.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT