Osmanabad Osmanabad
मराठवाडा

उस्मानाबादमध्ये औद्यागिक वसाहतीजवळील भीषण अपघातात एकाचा मृत्यू

सोबत असलेले शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हे जखमी झाले आहेत

तानाजी जाधवर

सोबत असलेले शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हे जखमी झाले आहेत

उस्मानाबाद: शहरातील औद्यागिक वसाहतीच्या समोरील रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेले शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हे जखमी झाले आहेत. हा अपघात रात्रीच्या दोनच्या सुमारास झाला. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रस्ता चुकल्याने व गाडी नियंत्रित न झाल्याने अपघात झाला. सुरज शिंदे व संजय मुंडे हे दोघे समोर पुढील सीटवर बसल्याने गाडीला धक्का बसल्यानंतर एअर बॅग उघडल्याने त्यांचा बचाव झाला.

मात्र पाठीमागे बसलेले बाळासाहेब देशमुख यांना जोराची धडक बसली व त्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर इजा झाली. काही वेळातच ते बेशुद्ध झाले व नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास डस्टर कारने परगावी जात होते. बाळासाहेब देशमुख हे शिवसेनेमध्ये सक्रिय काम करत होते. त्यांनी एकवेळा नगरपालिका एकदा जिल्हापरिषदेची निवडणूकदेखील लढविली होती. त्यांच्यावर येथील कपिलधार स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT