Osmanabad Corona News 
मराठवाडा

उस्मानाबादच्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शन मिळेना; उपचारासाठी गाठावे लागते बार्शी अन् सोलापूर

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या तीन हजारांच्या पुढे जात आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात बेड उपलब्ध आहेत की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार होत असल्याचे चित्र आहे. सामान्य जनतेमध्ये याची धास्ती वाढल्याने प्रशासनाकडुन जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलनिहाय शिल्लक बेडची संख्या सांगणे आवश्यक बनले आहे. गेल्या काही दिवसांपासुन वाढती संख्या विचारात घेऊन अनेकांनी इतर जिल्ह्यात उपचार घेण्यासाठी धावाधाव केल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये असलेली शासकीय रुग्णालयाची क्षमता तशी राज्यामध्ये सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. साडेतीनशेच्या जवळपास जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्णावर उपचार घेण्याची सोय आहे.

एवढी क्षमता असल्याने जिल्ह्याला मोठा फायदा झालेला आहे. शिवाय औषधी किंवा ऑक्सिजनचा तुटवडा शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत भासलेला नाही. त्याचे नियोजन अत्यंत चांगले असुन त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना आता शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याची इच्छाही निर्माण होत आहे. त्याअगोदर रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नसल्याच्या अफवा बाहेर मोठ्या प्रमाणात सूरु आहे. त्यामुळे शासकीय ऐवजी खासगीकडे पहिल्यांदा विचारणा होत आहॆ. पण सध्याच्या स्थितीला ऑक्सिजन किंवा इंजेक्शनच्या अभावी अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे.

साहजिकच त्यामुळे रुग्णाला थेट बार्शी किंवा सोलापुरला उपचारासाठी जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जर प्रशासनाने बेडची संख्या जाहीर केली तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. सध्या कुठे किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. वाढती रुग्णसंख्या असल्याने अगोदरच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे. साहजिकच त्यांना उपचाराची सोय कुठे उपलब्ध होईल याचा जरी अंदाज असेल तर मोठा ताण कमी होणार आहे. त्यामुळे दररोजची शिल्लक बेडची संख्या जाहीर करण्याची आवश्यकता आहे. 
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT