Thunderstorm Killed Surekh Garad Osmanabad 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पडून महिला शेतकरी ठार

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी (ता.११) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून वीज पडून महिला शेतकरी ठार झाली आहे. वादळामुळे केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावातील नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडाले आहेत. दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा मिळाला आहे.


वीज पडून महिला शेतकरी ठार
खेड (ता.उस्मानाबाद) येथील महिला शेतकरी सुरेखा ज्ञानोबा गरड (वय ४९) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. शेतातील कांदे काढण्याचे काम सुरू होते. त्यांच्यासोबत सविता तुकाराम गरड अन्य एक महिला होती. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास वादळी वारा सुरु  झाला. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. म्हणून वडाच्या झाडाखाली बसण्यास गेल्या होत्या. त्याच दरम्यान सुरेखा यांच्या अंगावर वीज पडून  जागीच मृत्यू झाला. तर सविता जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

दोन दिवसांपासून पाऊस
सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस  जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावित आहे. शनिवारी (ता.दहा) सायंकाळच्या सुमारास कळंब तालुक्यातील गोविंदपूर, देवधानोरा, मंगरुळ, शेळके-धानोरा आदी भागांत जोरदार हजेरी लावली. वादळासह सुमारे अर्धातास पाऊस झाला. दरम्यान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे. रविवारी ही जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला आहे. भूम तालुक्यातील ईट परिसरातही वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. यावेळी वादळी वाराही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय पाथरुड परिसरात रविवारी पहाटे, तुरोरी (ता. उमरगा), अचलेर (ता. लोहारा), उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, खामगाव, रुई येथेही वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

घरावरील पत्रे उडाले, आंब्याचेही नुकसान 

येडशी येथे काही कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. यामध्ये जीवनावश्याक वस्तुंचेही नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. रविवारी वादळाचा वेग मोठा होता. जिल्ह्यात केशर आंब्याचे क्षेत्र मोठे आहे. वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केशर आंब्याचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच साचल्याचे दिसून येत होते.

शहरातही पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी आलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. शहरातही सुमारे १५ मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT