anadur incident  
मराठवाडा

अणदुरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नळदुर्गात कडकडीत बंद

भगवंत सुरवसे

नळदुर्ग (उस्मानाबाद): जिल्ह्यातील अणदूर ( ता. तुळजापूर ) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेच्या निषेधार्थ  नळदुर्गवासीयांनी शनिवारी ( ता.सहा ) शहरातील बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या प्रकरणातील फरार झालेल्या तिसऱ्या आरोपीस अटक करावी व कठोर कारवाईसह इतर मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. तत्पुर्वी भवानी चौकात निषेध सभा घेऊन पोलिस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

या निषेध सभेस माहिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जगदिश राऊत यांना महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. अणदुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व  नळदुर्ग पोलिस ठाणे अंतर्गत बस प्रवासदरम्यान घडलेल्या शालेय विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणाचाही यावेळी निषेध करण्यात आला.

तसेच नळदुर्ग महाविद्यालय, बसस्थानक येथे वावरणा-या टवाळखोरांवर कारवाई करण्याची, बसस्थानक परिसरात सुरू आसलेले अवैध धंदे बंद करण्याची व बसस्थानकात कायमस्वरूपी दोन पोलिस शिपाई नेमण्याची मागणी केली. या निषेध सभेत शहरातील सर्वधर्मीय व्यक्ती, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, विविध  सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, महिला, व्यापारी, तरूणांनी मोठी गर्दी केली होती.

बंददरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी चांगला पाठिंबा दिला. बाजारपेठ बंद असल्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर बाजारात शुकशुकाट होता.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT