सक्षणा सलगर  sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागा अन्यथा

निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांवर अत्यंत हीन भाषेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन आमदार पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली (ता.26) हे आंदोलन करुन भाजपा नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी महिला वर्गाचा अवमान करणारे वक्तव्य केले.त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास बांगड्या घालून,जोडे मारुन दहन करण्यात आले.

खासदार सुळे यांची माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा सलगर यांनी यावेळी दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष संगीता काळे,मनीषा केंद्रे,शहर उपाध्यक्ष आरती आंबेकर,शहर कार्याध्यक्ष कमल चव्हाण,सुषमा शिंदे,मानसी आंबेकर,श्रद्धा पाटील,ज्योती गायकवाड,तनुजा घोलप यांच्यासह युवती कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT