osmanabad sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : वक्फ, इनामी जमिन मोजणीसाठी समिती?

जिल्हाधिकाऱ्यांचा भूमाफियांना हादरा

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यातील इनामी तसेच वक्फ जमीनीची योग्य माहिती घेण्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अनेक जमीनी वर्गएकमधून वर्ग दोनच्या केल्याने भू-माफियांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे एन-ए प्लॉट खरेदी करणाऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात वक्फ बोर्डाची तसेच इनामी जमीनीचा आकडा मोठा आहे. देवस्थान जमिनींचाही इनामी जमीनीमध्येच सामवेश होतो. ऐतिहासिक काळापासून अनेक देवस्थानकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. मात्र यातील अनेक जमिनी भूमाफीयांनी लाटल्या आहेत. त्यांची परस्पर विक्री केली आहे.

दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमामात वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. यातील अनेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. बेकायदेशीरपणे अशा जमिनींची विक्री झाली आहे. अशा सर्वच जमिनींवर कारवाईची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांनी सुरू केली आहे. त्यानंतर आता विभागीय आयुक्त कार्यालयातून याबाबात समिती नेमण्याच्या सुचना केल्या आहेत. या समितीकडून शहरासह जिल्ह्यातील वक्फ, इनामी जमीनीचे सर्ह्वेक्षण होणार आहे. ज्या ठिकाणी अशा जमिनी आहेत, त्याचाही याद्वारे शोध घेतला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा भूमाफियांना हादरा

शहरासह जिल्ह्यातील काही जमिनी भूमाफियांनी बेकादेशीरपणे हस्तांतरीत केल्या आहेत. गेल्या ५० वर्षात यामध्ये अनेक मातब्बर भूमाफिया मोठे झाले आहेत. याला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही साथ मिळालेली आहे. मात्र विद्यामान जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबात योग्य भूमिका घेत बेकायदेशीरपणे वर्ग एक केलेल्या सर्व जमिनी वर्ग दोनमध्ये रुपांतरीत केल्या आहेत. याचा दणका भूमाफियांना बसला आहे. तसा याचा फटका सर्वसामान्य प्लॉट खरेदी केलेल्या नागरिकांना बसला आहे.

बडे मासे सुटू नयेत

यातील काही भूमाफीयांना स्वतःचे हिस साधले आहे. ज्यांनी अशा जमिनी स्वतःच्या नावे करून घेतल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तेच ज्या अधिकाऱ्यांनी याबाबात शासनाची दिशाभूल केली. अशा अधिकाऱ्यंवर कारवाई करावी, अशी मागणी सामन्य वर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT