covid 19 covid 19
मराठवाडा

Osmanabad Corona Updates: जिल्ह्यात रुग्णसंख्या घटतेय पण वाढता मृत्यूदर चिंताजनक

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र समाधानकारक आहे

तानाजी जाधवर

उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा कमी होत असला तरी अजुनही मृत्युचा दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यामध्ये वाढलेल्या मृत्युदरामध्ये जिल्ह्याचा क्रमांक पहिल्या पाच मध्ये येत असल्याने अजुनही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यामध्ये मृत्युचा आकडा दुहेरीच येत असल्याने निश्चितपणे चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आता काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र समाधानकारक आहे. लॉकडाऊनचा काही प्रमाणात आता परिणाम दिसू लागल्याचे चित्र आहे. त्यातही लोकांनी स्वतःहून नियम पाळण्यास सूरुवात केल्यानेही त्याचा फरक दिसून येतोय. एका बाजूला वाढलेल्या रुग्णांचे प्रमाण आता हळुहळु कमी होत असताना दुसऱ्या बाजुला मृत्युचा आलेख मात्र दुर्देवाने चढताच असल्याचे दिसून येत आहे.

अशावेळी प्रशासनाकडून याबाबत अधिक उपाययोजना व शासकीय रुग्णालयातील व्यवस्था याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडची पुरेशी संख्या असली तरी व्हेंटीलेटरसाठी रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेकदा रुग्ण व्हेंटीलेटरवर जाण्याअगोदरच प्राण सोडत असल्याचे पाहयला मिळत आहे. त्यातही व्हेंटीलेटरवर गेलेल्या रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण देखील अत्यल्प झाल्याचे दिसून येत आहे. या लाटेमध्ये मृत्युचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे.

रुग्णांना दवाखान्याची वाटणारी भीती, त्यामुळे पहिल्यांदा लक्षणे आढळून आली तरी ते अंगावर काढताना दिसत आहेत. त्याचा परिणाम पुन्हा जाणवू लागतो व दुर्देवाने अशा कितीतरी लोकांना आपला जीव यामुळे गमावावा लागला आहे. कोरोना झाल्याची भीती रुग्णांना अधिक धोक्यात आणत असल्याचे चित्र आहे. मृत्यूचे प्रमाण पाहताना साप्ताहिक मृत्युदराचा आढावा घेतला असता त्यामध्ये जिल्हा गेल्या दोन आठवड्यापासून राज्यामध्ये दुर्देवाने आघाडीवर गेल्याचे दिसून येत आहे.

14 ते 20 एप्रिलमध्ये जिल्ह्याचा मृत्युदर 1.85 टक्के इतका होता. 21 ते 27 एप्रिल दरम्यान हा दर 2.81 वर आला. 28 ते चार मे या काळात हा आकडा 2.14 वर पोहचल्याचे दिसून आले. पाच मे पासून आता 11 मे पर्यंत हा आकडा अजूनही 2.39 वरच दिसत आहे. टक्केवारीच्या दरामध्ये ही वाढ कमी दिसत असली तरी आकड्यावरुन मात्र ही गंभीर बाब असल्याचे चित्र आहे. दररोज दहा ते वीसच्या दरम्यान मृत्यु होत असल्याने यावर नियंत्रण मिळाल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाले अस म्हणणे योग्य ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT