Umarga Crime News 
मराठवाडा

उमरगा पालिकेतील अपहार प्रकरणातील आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा!

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पालिकेत  पावणेदोन कोटी रूपयाच्या अपहार  प्रकरणातील चौथा आरोपी पवन मात्रे याला उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२३) सोलापूर येथून अटक केल्यानंतर बुधवारी (ता. २४) प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायधिश एम.टी. बिलाल यांनी आरोपीला शनिवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावणी. उमरगा पालिकेत पहिल्यांदा ४९ लाखाच्या अपहारप्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटी झाली. दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण, सचिन काळे यांनी यापूर्वी अटक झाली होती.

नंदकुमार झांबरे यांना अटकपूर्व जामिन मिळाला होता. तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे हा अजूनही फरार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ श्रीकांतनगर, जुळे सोलापूर येथे भाड्याने रहात असलेल्या घरातून पवन म्हात्रे याला मंगळवारी अटक केली होती. म्हात्रे याच्या नावावर ३९ लाखाचा अपहार असून या रक्कमेतुन खरेदी केलेली इनव्हा कार पोलिसांनी जप्त केली. पोलिस निरीक्षक श्री. शेजाळ यांनी मात्रे याला बुधवारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती तर मात्रे यांच्या बाजुने अॅड. मिलिंद पाटील यांनी बाजू मांडली. दरम्यान अपहाराच्या प्रकरणात बराच गौडबंगाल असल्याची चर्चा होती. सहा जणांनी संगनमत करून अपहार केल्याचे समोर आले मात्र यात कांही जण हात धुवून घेतल्याची नावे समोर येत नव्हती. ती आता अप्रत्यक्षपणे समोर येत आहेत, सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा होते पण अधिकृत माहिती मिळत नाही. मात्र "छुपे रुस्तुम" यांच्या नावाची शहरवासियात चर्चा होत आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : 'एक इंचही जमीन देणार नाही'; वाळव्यात शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध, ईश्वरपुरात मोर्चा

Arshdeep Singh: गोलंदाजांनी कणखर होण्याची गरज; अर्शदीप सिंग, दवात गोलंदाजी करण्यासाठी ओल्या चेंडूवर सराव

Krishna River Fish Death in Sangli : राजारामबापू कारखान्‍याने कृष्णा नदीत पाणी सोडल्यामुळे लाखो मासे मेले; सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप

Gold Rate Today: सोन्याच्या भावात महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल! 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Mathura Holi: होळीसाठी मथुरेला जाताय? ४० दिवस चालतो रंगांचा पाऊस; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT