Lohara Crime News 
मराठवाडा

कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेला मुलगा आईला धक्कादायक अवस्थेत आढळला

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील सालेगाव येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता.तीन) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोविंद व्यंकट करदोरे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. गोविंद करदोरे यांना तीन एकर शेती आहे. शेतात कांद्याची लागवड केली आहे. शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे गोविंद हे आपल्या आईसोबत कांद्याला पाणी देण्यासाठी शुक्रवारी रात्री मुक्कामासाठी शेतात गेले होते.

कांद्याला पाणी देत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीने गोविंद यांच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून जखमी केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता.तीन) पहाटे साडेपाचच्या सुमारास गोविंद यांचा शोध घेतला असता शेतातील विहिरीलगत त्यांचा मृतदेह आई रूक्मिणी यांना मिळून आला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक, तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी, लोहारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु  आरोपींचा सुगावा लागला नाही. मृत गोविंद यांच्या आई रूक्मिणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT