Osmanabad Crime News 
मराठवाडा

रक्षक बनला भक्षक! बंदुकीचा धाक दाखवून पोलिसाने केला विवाहितेवर बलात्कार, महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिले सुसाईट नोट

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : एका ३२ वर्षीय विवाहितेने मंगळवारी (ता.दोन) बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारी म्हटले आहे, की उस्मानाबाद पोलिस दलातील एका पोलिसाने सप्टेंबर २०२० पासून वेळोवेळी माझ्या पत्नीस बंदुकीचा धाक दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याने तिने आत्महत्या केली आहे. यावरुन संबंधित पोलिसाविरुद्ध कलम ३७६, ३०६, ५०६ अंतर्गत उस्मानाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही पोलिस खात्याला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत महिलेने सुसाईड नोट लिहिले आहे.


या प्रकरणी पोलिस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन दोन सुसाईड नोट सापडल्या असून त्यात पोलिसाच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. महिलेने सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे, की मी माझ्या मर्जीने आत्महत्या करित आहे. याला जबाबदार हरिभाऊ रामदास कोळेकर असणार आहे. मी फाशी घेणार आहे. त्या कोळेकरच्या घरी करारण त्यानेच माझे वाटोळे केले. त्याने माझा पहिल्यांदा घरी येऊन रेप केला व त्या आधारे मला सारखे धमकावत होता. बंदुकीचा धाक दाखवून. यात माझ्या नवऱ्याचा काय दोष नाही.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT