उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनामुक्त झालेल्या उमरगा तालुक्यात परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उमरगेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महिनाभरात एक हजाराहुन अधिक नागरिक दाखल झाल्याने कोरोनाविषयीचा संशयकल्लोळ वाढला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत मुंबई, पुणे शहरातून जवळपास दिडशेहून अधिक नागरिक दाखल झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होत आहे.
उमरगा शहरासह तालुक्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य, महसूल, पोलिस व ग्रामपंचायत स्तरावरील समितीने विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर बाधित व्यक्तींचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दिलासा मिळाला खरा; पण बाहेर परराज्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत विभागीय पथकाने घेतला उपाययोजनांचा आढावा
गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाने सतर्कता बाळगत परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना थेट घराकडे न पाठवता पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तपासणीनंतर होम क्वारंटाइनचा शिक्का मारुन त्या लोकांची राहण्याची सोय शाळेत केली जात आहे. साधारणतः १४ एप्रिलपासून १५ मे पर्यंत ग्रामीण भागात आलेल्या लोकांची संख्या एक हजार ४७५ झाली आहे. त्यातील ५१४ लोकांची सोय शाळेत करण्यात आली आहे. ४७७ जण शेतात राहत आहेत, तर ४८२ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. एकुण संख्येपैकी २३२ जणांना चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.
येथे क्लिक करा - जाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना
उमरगा शहरात दाखल झालेली संख्या २१५ झाली आहे. त्यात होम क्वारंटाइनमध्ये १८१, शेतात एक, तर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये काही आहेत. ३५ जणांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मुरूम शहरात आलेल्या नागरिकांची संख्या सत्तरहून अधिक आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तालुक्यात तब्बल सहाशे अधिक लोक दाखल झाले आहेत.
वाढत्या संख्येमुळे संशयकल्लोळ
उदरनिर्वाहासाठी परजिल्ह्यात गेलेल्या नागरिकांना कोरोनाने सळो की पळो करून सोडले आहे. मोठ्या शहरात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या मजूरांवर सर्व काही बंद असल्याने उपासमार होत आहे. अशा स्थितीत कसे राहणार, या प्रश्नाने हताश झालेल्या नागरिकांना गावाची ओढ लागली. मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी रेड झोनमधील जिल्ह्यातील लोक गावात येत असल्याने नागरिकांमध्ये कोरोना विषयीचा संशयकल्लोश वाढला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांत तर संख्या वाढली आहे. दरम्यान पंधरा दिवसापूर्वी महसूल प्रशासनाने बाहेरून आलेल्या सर्व लोकांचे स्वॅब घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या होत्या; मात्र सरसकट लोकांचे स्वॅब घेतले जात नाही. शरीरात दडून बसलेल्या विषाणूची लक्षणे केव्हा जाणवतील याचा नेम नसल्याने भीती निर्माण होतेय.
‘त्या’ सात जणांचे अहवाल निगेटिव्ह
इचलकरंजी येथून गावाकडे परतलेल्या सात जणांसह एका गर्भवती मातेचा स्वॅब मंगळवारी (ता.१२) तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. बुधवारी (ता.१३) अहवाल प्राप्त झाला असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. सोमवारी रात्री इचलकरंजी येथून प्रशासनाची परवानगी घेऊन सात जण दाखल झाले. त्यातील सहा जण उमरगा तालुक्यातील तीन गावातील, तर एक जण लोहारा तालुक्यातील होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.