File photo 
मराठवाडा

भूम शहरातील रुग्णाच्या संपर्कातील पाच पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. येथील शासकीय रुग्णालयातून बुधवारी (ता. १७) सकाळी ४७ स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. नवे पाचही रुग्ण भूम शहरातील लक्ष्मीनगरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या पाचजणांसह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या १५९ वर गेली आहे. त्यातील १२५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पाचजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या २९ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली.

जिल्ह्यामध्ये संशयितांची संख्या आता सात हजार ९१८ एवढी आहे. त्यातील सात हजार ८७० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहा हजार ८३७ जणांना होम क्वारंटाइन, तर एक हजार ३३ नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.

आतापर्यंत सहा हजार ६१९ जणांनी चौदा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ४३१ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यातील १५९ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये चार रुग्ण हे परजिल्ह्यांमध्ये बाधित झाले असले तरी त्यांचा समावेश जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे. 

फनेपुरातील आठ ही निगेटिव्ह 
फनेपूर (ता. लोहारा) येथील कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दहापैकी आठजणांचे स्वॅब अहवाल मंगळवारी (ता. १६) रात्री निगेटिव्ह प्राप्त झाल्याने प्रशासनाबरोबरच परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उर्वरित दोघांचे अहवाल हे संदिग्ध आले आहेत.

रविवारी (ता. १४) रात्री येथे पुणे शहरातून आलेल्या एका तरुणाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. प्रशासनाने तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करीत परिसर सील केला आहे.

मंगळवारी (ता. १६) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने येथील सरपंच मुक्ताबाई भोजने यांच्या हस्ते घरोघरी आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. आता गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत असून पाच दिवस गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. 

फनेपूर येथील आठजणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर आई व बहिणीचे अहवाल संदिग्ध आले असून, त्यांचे स्वॅब पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. आता येथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करून घरोघरी आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचाऱ्याकडून सर्व्हे करण्यात येत आहे. येथे चौदा दिवस आरोग्य सर्व्हे करून रुग्णाचा शोध घेतला जाणार आहे. 
- डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT